ग्रहण
ग्रहणासंबंधी माझे विचार, ग्रहण हे सूर्य आणी चंद्र यांनाच लागते आपण असं मानतो आणी आपल्या लेखी तेच सत्य आहे . कारण आपण पृथ्वी वर राहतो सूर्य आणी पृथ्वी भोवती फिरणारा पृथ्वी चा उपग्रह चंद्र हे ग्रह आपल्या डोळ्या समोर आहेत ते एकमेकांन भोवती फिरत असतात. म्हणुन जेव्हा एका सरळ रेषेत आले तेव्हा एका आड दुसऱयांची सावली पडली कि आपण ते ग्रहण समजतो आणी तसं आहे. मग कधी चंद्र किंवा सूर्य यातील दोघाच्या मध्ये कोण आला त्याच ग्रहण मानले जाते. बरं विश्वात अनेक ग्रह आहेत आणी अनेक सौर माला पण आहेत त्या त्या सौर मालेतील ग्रह यांची एकमेकांची सावली किंवा सरळ रेषेत ते काही ग्रह येतं असतील तर आपण जर ते दिसलें असते तर आपण त्यांना पण ग्रहण लागेल असं म्हटले असते दिसत नाहीत म्हणुन मानवास ते माहित नाही असं म्हणावं लागेल. ग्रह आणी ते फिरत असतांना त्याची पडलेली पडछाया यास आपण ग्रहण म्हणतो आणी मानत आलो आहोत अगदी अनादी काळ पूर्वापार.
प्राचीन काळी ग्रह आणी तारे यांच्या विषयी एक शास्र होते आणी आज पण आहे. त्यास कोणी जोतिष शास्र म्हणतात. पण मला असं वाटते कि पूर्वी लोक प्रगत आणी हुशार असले पाहिजेत. असं वाटते कुठले पण आज आपण म्हणतो भौतिक शास्र सायन्स खुप प्रगत झालं आहे आणी आज आहे सुद्धा अगदी सर्व शोध लागले चंद्र परिक्रमा मानव करून आला आणी टेक्नॉलॉजी खुप प्रगत झाली मशीन सर्व प्रकारची काम करू लागली. पण
पूर्वी मानव प्रगत न्हवता म्हणणारी जी लोक आहेत त्यांना एक सांगु ईच्छितो वाळवन्टात कुठं कसं जायच राहायचं किल्ले त्या वरील काम ताजमहाल सारख्या वास्तू चीन ची भिंत पिरॅमिड कोणार्क सूर्य मंदिर, मस्जिद, चर्च अदभुत कलाकृती आहेत, लेणी त्यातील चित्रं आज पण पुसली गेली नाहीत त्या काळातील बांधकाम टिकून आहेत. माणसं घळ्याळ नसताना वेळ सांगत यांचा अर्थ कोण प्रगत आणी कोण अप्रगत तुलना केली तर पूर्वी ची लोक प्रगत बुद्धिमान असंच मी म्हणेन पण ते आपणास पटणार नाही असो.. विषय आपण ग्रहण वर बोलत आहोत आणी मी लिहीत आहे हे सांगायचं प्रयोजन पूर्वापार चालत आलेल्या काही परम्परा या आज च्या आपल्या आधुनिक शास्र ला धरून आहेत नव्हे आहेतच पण आपणास त्या अजून पर्यंत समजल्या नाहीत असं वाटते फार थोडया काही अंधश्रद्धा असल्या पाहिजेत.. त्या काही ढोंगी लोकांनी त्यात मिसळल्या असतील असो.. मी म्हणतो मग त्या काळातील परंपरा पाळायच्या का तर मी होय पण नाही पण सांगेन कारण तत काळी लोक ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहुं नये सांगत हे अगदी आज पण खरं आहे नव्हे सत्य आहे म्हणुन लहान मुलं महिला त्याना बाहेर येऊ देत नसतं असं मला वाटते. असं सौर मालेत ग्रह फिरत असतांना आपण म्हणजे माणुस किंवा पृथ्वी वरील चल अचल सृष्टी वर त्याचा परिणाम होतो हे आपणास मान्य आहे. भरती ओहटी येते त्याच कारण ग्रह फिरणं कोणत्या ग्रहाची शक्ती कुठं ओढ्त असते हे सांगणं आपणास कठीण आहे. कारण सुष्म प्रमाणात बदल घडत असतो. सजीवांच्या शरीरात असलेले पाणी आणी रक्त त्या त्या कसं कमी जास्त प्रमाणात शरीरात फिरत त्या वरून त्या जिवा वर काही अशीं परिणाम होत असला पाहिजे. वरून कुठली पण मानवास हानी दिसत नाही. सुष्म रूपात असली पाहिजे पण काही तरी घडतं बद्ल. थोडं कसं तरी होत ग्रहण काळात जे अगदी सुष्म असतं जीव साठी कारण त्यात पाण्याच प्रमाण कमी असत.. समुद्रात खुप पाणी असतं म्हणुन भरती ओहटी येत असली पाहिजे मग पाणी जीव मध्ये पण आहे मग जीवावर सुद्धा परिणाम होत असला पाहिजे असं माझं मत आहे... असं वाटते मी काही शास्रन्य नाही पण वाटते काही तरी बदल होत असला पाहिजे...मी जोतिष शास्र याच समर्थन करत नाही पण ग्रह तारे यांची स्थळ स्थिती या वर काही तरी नव्हे सार अवलंबून असतं... ग्रहण काळात चालणाऱ्या बुवाबाजी भोंधू गिरी हि शुद्ध फसवणूक ग्रहण म्हणुन हे करू नका ते करू नका हे मला मान्य नाही.. पण मला असं वाटते गर्भवती स्त्री यांना घरा बाहेर पडु देत नसतं कारण गर्भ म्हणजे एक पाण्याची टाकी किंवा गोळा असतो नव्हे आहे त्या चं कमी जास्त होणं हे तंत कालीन लोकांना समजत असलं पाहिजे असं मला वाटते या वर नवीन शंशोधन करावे असं वाटते.. खुप लिहिले यातील जे आपणास आवडेल ते घ्यावे चूक असेल ते सोडून दयावे हि नम्र विनंती मी माझ्या अल्पश्या बुद्धी ने लिहिले आहे.. लिहायला खुप उदाहणे देता येतील पण लेख मोठा होईल म्हणुन थांबतो...आणी शुभ अशुभ फळ यात मला पडायचं नाही आणी पडु पण नये असं वाटते शास्त्रीय दृष्टीकोना तुन मधून पाहावं...
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव ©®

Comments
Post a Comment