निर्वासितांचे लोंढे आणि विदेशी घुसखोरी.

 निर्वासितांचे लोंढे आणि  विदेशी घुसखोरी.

देश स्वतंत्र झाला त्या दिवसा पासुन आपल्याला हि समस्या भेडसावद आहे. मुळात फाळणी झाली तेव्हा भारताने सर्वधर्म समभाव अंगिकारला स्वीकारला आणि नंन्तर आज तागायत  जोपासला. पण भारतातुन पाकिस्तान वेगळा होत असतांना त्या देशाने इस्लामी राष्ट्र म्हणुन आपली चुल वेगळी मांडली नव्हे त्याचं संकल्पनेतून त्या देशाचा उदय झाला. मुस्लिम बहुल प्रांत म्हणुन पाकिस्तान निर्माण झाला. त्यात काय झाले तेथील बहुसंख्य हिंदु येथे आले पण फार कमी संख्येने मुस्लिम येथुन तेथे गेले. काय तर येथील मुस्लिम यांचा भारतीय जनता भारतीय नेते संस्कृती या वर पूर्वापार असलेले प्रेम. मग तेथील हिंदूच त्या देशावर प्रेम नव्होते का तर होते पण जातीय दंगली तेथे जास्त प्रमाणात उफाळुन आल्यात त्याचा परिणाम.भारतात महात्मा गांधी, पटेल, नेहरु,आंबेडकर  आणि तंत समई असलेली नेते मंडळी आणि  सारी भारतीय गुणी संस्कारी जनता. सामोपचार सदभावना  येथे रोम रोमात भरला होता आणि आहे. म्हणुन येथील मुस्लिम तिकडे गेला नाही तो समाज पण त्याचं पद्धतीने येथे राहतोय राहात आलाय अब्दुल हमीद त्या सारख्यानी  तेव्हा सिद्ध पण केलंय. आज अनेक या विचारने चालणारे सारे आहेत म्हणूनच अब्दुल कलाम येथे जन्मतात जन्मले..   तरी काही हिंदु शीख तेथे पाकिस्तान मध्ये  आज पण आहेतच कि त्यांच त्या देशावर असलेले प्रेम.... याचा अर्थ काय? काय तर " लोक आपण जन्मलेल्या मातीवर प्रेम करतात जाती पेक्षा जास्त नंन्तर  जातीवर असंच" ... हे त्रिकालाबाधित सत्य आहे..... सारं लिहण्याचं कारण भारतात पहिले  निर्वासित म्हणुन आली निर्वासित  म्हटली गेली. नंन्तर घुसखोरी सुरु झाली सुरवात तेव्हा झाली जी भारतीय लोकसंख्या जी होती फाळणी करून वाट्याला आलेली  त्यात बरीच वाढ झाली... नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानाची पुन्हा फाळणी झाली बांग्लादेश निर्माण झाला तेव्हा बांगलादेशातून अनेक हिंदु आले आणि भारतातील सर्व शहरात पसरले  प्रत्येक शहरात एक वेगळी वसाहत निर्माण केली आणि राहु लागली त्यात  सर्व जगाचं लक्ष वेधुन घेणारी वसाहत मुबंई जवळ  जेथे असं म्हटलं जातं  जगात जी वस्तु निर्माण झाली त्याची तिसऱ्या दिवशी डुप्लिकेट कॉपी निर्माण होते ती वसाहत त्यांनी येथे आल्यांनंतर एकोप्यात आपलं साम्राज्य निर्माण केलं. त्यात आसाराम सारखी संत पण निर्माण झाले पैसा कमवणं एकमेव मार्ग पण खुप जण बहुसंख्य चांगली माणसं आहेत सर्वच डुप्लिकेट करत नाहीत जो वेवसाय आपण करत नाही येथील जनतेला आवडत नाही मद्य, प्यायला चालतं पण विकायला लाज धरतात काही  भारतीय माणसं... तेथे यांनी पकड मिळवली सोबत  हॉटेल  कापड वेवसाय व सर्व उधोगधंदयांत  पण या समाजाने बरीच पकड निर्माण केली अगदी थोडया अवधीत... हा दुसरा लोंढा भारतात आला बसला स्थिरथावर झाला.. पुन्हा लोकसंख्या वाढ.. बरं हे येथेच संपलं  असं नाही तर हि सुरवात झाली जी सर्व संमतीने सर्वा देखत जनता आणि सरकार यांना आलेली यांची कीव म्हणा वाटल्यास कुठं जातील ते बिचारे आपलीच माणसं आहेत माणुसकी भारताने जोपासली इथं पर्यन्त तरी ठीक होत.. माझा त्यांना विरोध नाही तेव्हाची सारी निर्वासित आता भारतीय आहेत देशावर प्रेम करणारी . गुण्यागोवींदाने नांदत आहेत  त्याच्या  भावना दुखवण्याचा हेतु पण नाही  नकळत कुणाच्या भावना  दुखावल्या  असतील तर येथेच क्षमा असावी... जे झालं ते झालं तो विषय  तिथपर्यंत ठीक होता.  त्या वेळ नंन्तर पण  हे सत्र तद नंन्तर सुद्धा थांबलं नाही तर अविरत एक एक कुटुंब नियमित कधी कधी येणं सुरूच त्यात पाकिस्तान  आणि  लगतची राष्ट्र त्यात  विशेष करून बांगलादेशातून ओघ एखादया झऱ्या सारखा पांझरत असतो हे मात्र आता थांबलं पाहिजे हा झरा बुजवला गेला पाहिजे यात कुणाही भारतीयाने शंका  किंवा विरोध करायच कारण नाही....  नंन्तर जी आज पर्यन्त आली जी या वीस तीस वर्ष्यात यांना शोधलं गेलं  पाहिजे सरकारने आणि त्यांना त्यांच्या देशात परत  पाठवलं पाहिजे मग ती कुठल्याही जातीधर्माचे असोत हिंदु राहु दया ईतर आहे  पाठवा बाहेर असं नको..आपल्या भारताची अगोदरच लोकसंख्या वाढ येथेच उपलब्ध साधनं कमी पडु लागलीत अन्न वस्र निवारा समस्या सतावत  आहेत  त्यात हा नकळत समजतं नसलेला ध्यानी न येणारा पण मोठा प्रश्न.. हा येणारा झरा अगोदर बंद केला पाहिजे जो आत आलाय तो शोधला गेला पाहिजे  येऊन त्यांनी कुठं कसं कागदपत्र केलं कोण त्यांना मदत करत हेही तपासणी झाली पाहिजे भ्रष्ट अधिकारी वोळखपत्र शिधापत्रिका कश्या मिळाल्या शोधणे  गरजेचं आहे समीक्षा होणं... हा प्रश्न जातीचा नाही आपल्या देशातील मातीचा आहे एक कुटुंब आलं त्या कुटूंबाने आपलीच माती बळकावली तर कसं चालेल.. इतिहास सांगतोय" व्यापारी म्हणुन आले आणि राज्यकर्ते झाले". त्याची पुनरावृति नको आश्रित म्हणुन येतील आणि आपणच भारतीय परकं  होऊ.. अलीकडे मधुन मधुन या प्रश्नावर राजकीय पक्ष बोलत असतात  बोलतात पण नंन्तर कुठंच काहीच हालचाली होत नाहीत जैसेथे असतं सारं जसं सुरळीत पणे अविरत.... नुकतंच महाराष्ट्र नवं निर्माण सेना यांचे अध्यक्ष मा. राज  यांनी हा मुद्दा उचलला उचलत असतात तो आज तरी योग्य वाटतो..  शासनाने गांभीर्याने या कडे पाहिलं पाहिजे राजकारण व  जात  विरहित देशहित जनता हित समजुन सोडवला गेला पाहिजे केंद्र आणि देशातील साऱ्या राज्यांनी.



प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट. गणपूर 
ता. चोपडा जिल्हा. जळगाव

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे