इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय...

 इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय.

भाषा  मराठी आणि बोली यात बहुतांश ठिकाणी बराच फरक आहे. महाराष्ट्रात मुळात  प्रत्यक्ष पाच ते दहा किलोमीटर वर बोली बदलते बोलण्याची पद्धत बदलते. मराठी माणसाने  आपली माय मराठी अंगिकारली  वाचन लेखन शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय सर्व कार्यालयात मराठीत लिखाण होतंय होत आलंय जळगाव ची मराठी बोली वेगळी तर पुण्या मुबंई नागपूर अन्य शहरात गावात भाषा मराठीच पण बोली  भाषा बोलण्याची पद्धत वेगवेगळी याचाच अर्थ लिहण्याची मराठी आणि बोलण्याची पद्धत  यात फरक आहे आणि सर्वदूर दिसतो.
    मुळ आपला विषय आहे इंग्रजी मुळे मराठी खालावली असं. तसं पाहिलं तर कोणत्या भाषे मुळे कोणती भाषा खालावत नाही आणि उंचावत नाही भाषा अंगीकार जोपासना बोली लिहणं वाचन करणं आपल्या प्रत्येकाच्या आपल्या हातात ओठात असते. आपण अगोदर मराठी अंगीकार केला आहे तर तो टिकवणं पुढच्या पिढीत रुजवण जोपासणं बोलणं आपल्या हातात आहे. आपणास आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकण्यास घालतो पाठवतो काय तर इंग्रजी हि जगमान्य अनेक देशात बोली लिहण्याची भाषा आहे आंतरराष्ट्रीय पातळी वर  आपण मागे पडु नये जगाच्या पाठीवर आपला पाल्य मागे राहु नये हा आपला समज म्हणुन भारतात सर्वदूर इंग्रजी भाषेचं इंग्रज गेल्या नंन्तर पेव फुटलं जो तो बोलु वाचु लिहु  पाहुं वागु लागला इंग्लिश बोललो तर फार मोठं वाटतं मोठे साहेब आहोत असा आवं भास निर्माण करण्यासाठी अगोदर तोडकी मोडकी मग थोडं सुधारित इंग्रजी वापर केला जातोय करताय मुलं इंग्रजी शाळेत टाकले म्हणजे त्यांना ती भाषा चांगली यावी त्यांच्यात ती रुजावी म्हणुन पालक पण जी येतं नाही ती समजुन घेण्याचा प्रयत्न करतात ज्यांना येते ते तर घरी पण मुलांना चांगलं इंग्रजी यावं म्हणुन त्यांच्या सोबत आपली मातृभाषा विसरून इंग्रजीत घरी बोलु लागतात असं  दिसतं आणि आहे.यात काय झालं आपली येणारी पुढची पिढी इंग्रजी लिहिल बोलेल वाचेल मग कशी मराठी टिकेल. आज हिलोक  बाहेर पडलेत कि पुन्हा मराठी कुणाशी इंग्रजी या मुळे काय झालं कुठं भाषे ची संमिश्र भेळ तयार करून अगदी याच वाक्य त्याच्यात त्याच वाक्य यांच्यात मिसळून धड मराठी नाही आणि इंग्रजी नहीं असं होतं कधी असं काही ठिकाणी थोडं माझं निरीक्षण पण भाव आणि आवं मात्र मी माझे मुलं कसे शहाणे इंग्रजी कशी छान  बोलतात.  आम्ही  हुशार आम्हाला  बोलता येतं असा काहींची समज  दिसतो बाकी खरोखर हुशार असतात बरं नाही तर माझ्या लिहण्याचा विपर्यास करून टीका करतील. खरं तर पुर्वी मराठी शाळेतील मुलं इंग्रजी शिक्षण घेऊन मराठी जोपासुन परदेशी गेली म्हणजे मराठी टिकली आणि इंग्रजीत आपलं काम पण झालं.मला वाटतं सेमी इंग्रजी शाळा छान आहे.. मराठी पण आणि काळाची गरज पण...            
     इंग्रजी भाषा हि काळाची गरज झाली आणि आहे त्यावर टीका करता येणार नाही तसा माझा अधिकार पण नाही. पण इंग्रजी भाषा शिका वाढवा त्या सोबत मुळ माय मराठी विसरू नका तिच्यावर अन्याय होईल असं वागु नका एवढंच सांगणं आहे. अनेक  वेळा आपल्या गावात प्रांतात शहरात बाहेरून किंवा गावातील कोण  उर्दु,  हिंदी,  गुजराथी, तमिळ कन्नड अशीं शेजारी किंवा गावातील शहरातील लोक पण ती त्यांची बोली सोडतं नाहीत पण मराठी लोक  काय करतात आपली भाषा बोलणं सोडुन जी समोरचा बोलतोय ती भाषा बोलायला लागतात हस होत आपलंच पण मला हिंदी येते असं दाखवतो. मला एक सांगायचं आहे जी लोकं वर्ष न वर्ष येथे आली राहिली ती लोकं आपली भाषा सोडतं  नाहीत पण मराठी माणुस मराठी सोडुन त्यांची भाषा बोलु लागतो ज्याची गरज नसताना. मला सांगायचं आहे आपण मराठी बोला समोरचा वेक्ती येथे महाराष्ट्रात आला तर मराठी  येतं असेल तरी बोलत नहीं  किंवा नसेल येत तर  शिकुन घेईल पण तुमी का त्यांची भाषा अंगीकार करता.उलट त्यांनी मराठी अंगिकारली पाहिजे असं आपण बोललो पाहिजे..  जर खरंच जमत नसेल नवीन असेल तर तेव्हा त्यांची बोली  बोला वाटल्यास. हा मराठी वर मराठी माणसाने केलेला अन्याय आहे. असं जर सुरु राहिले तर एक दिवस  आपली अगोदर ची पूर्वजांची पुरातन  भाषा  मोडी मोडीत काढली अगदी तसंच  मराठी पण मोडीत निघेल यास जबाबदार ईतर भाषा नव्हे मराठी माणुस जबाबदार...आपण चुक करायची आणि दूसर्यास जबाबदार धरायचं असं होईल.. जे आहे ते आहे सुचलं तसं लिहलं... चुक असेल ते माझं बरोबर असेल ते आपलं... शेवटी एकच संत ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे. !अमृताहुणी  पैजा जिंके माय मराठी!.....मग काय मारेल इंग्रजी.



प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट. गणपूर 
ता. चोपडा. जिल्हा. जळगाव 

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे