शोध सत्याचा

|| शोध सत्याचा ||

   सत्य याचा अर्थ काय तर पृथ्वी वर जीवसृष्टीत  वर्तमान भूतकाळ यात घडलेल्या वास्तव गोष्टी. वास्तव हेच सत्य असं मला वाटते. जे आहे तेच सत्य आहे. त्यात जे लपवलं जातं ते खोटं असत्य असंच आहे. मनात जे असेल त्या क्षणाला तेच ओठात आलं पाहिजे तेच सत्य मनात एक ओठात दुसरं ते असत्य. मग तो विषय कोणता पण  मनातलं असो वा बाहेरील वास्तव,  वास्तविकता याला सत्य म्हणतो आणी मानलं जातं असं वाटते.               
   हा लेख लिहण्याचा प्रपंच असा सुचला फेसबुक वर एक पोस्ट आली ती वाचली त्या वरून लिहतोय. पोस्ट अशीं "मी जन्माला आलो तेव्हापासून सत्याच्या शोधात आहे हे सत्य पाहिले का कृपया सांगा " पोस्ट लिहणाऱयाने वास्तव लिहलं असं वरकरणी वाटते पण त्याला हे उमगलं नसेल. सत्य म्हणजे काय आणी सत्य असतं कुठं आणी शोधायचं कुठं. सत्य हे आपल्यात आहे तर सत्य दिसते आधी ते आपल्यात असावं आणी मग दुसऱ्यात शोधावं त्याला शोधत बसलात तर उभ आयुष्य वाया जाईल पण जगात कुठंच मिळणार नाही त्या साठी मी म्हणेल दिव्य दृष्टी हवी. ती आपल्यात नाही मग शोध कसा लागेल. शोधून मिळणार नाही तर ते प्रथम स्वतः अंगीकाराव लागेल मग सर्व सत्य समोर येईल दिसेल आपल्या दृष्टीत सर्व आहे. जे पाहाल ते दिसेल सर्वांना जर भ्रष्ट असत्य वादी बघाल तर खोटं असत्य वाटेल पण तसं नाही. या दुनियादारी मध्ये खुप वाईट लोक आहेत तर खुप चांगली लोक पण आहेच कि दोघी बाजु आहेत मानतो कि सत्याला कस लागतो त्याची परीक्षा पाहिली जाते त्यास यातना त्रास आहे असं म्हटलं जातं कि सोन्याला कस लागतो तापवले   जाते तांबे पितळ लोखंड याला कोणी कस लावत नाही तर त्यास कोणी विचारत पण नाही. अगदी तसंच आहे या कलियुगात खोटं जास्त दिसते आहे असं वाटते खोटी लोक खुप पुढे वाटतात शेवटी ती अपयशी ठरतात हेच खरं खोटं प्रेम कधीच टिकतं नाही अगदी तसंच खोट्यावर उभ राहिलेले साम्राज्य लवकर उभ राहात असतं भव्य दिव्य वाटते पण ते लवकर ढासळत असतं खोटी माणसं प्रेमात असो वा जीवनात असो ते आपलं हित लवकर साध्य करतात पण नंन्तर पस्तावतात त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. प्रेमी,  नोकरदार,  वा राजकारणी असो किंवा उदयोजक  खोटे भ्रष्ट. मार्गाने जर पुढे गेले तर त्याचा उदय लवकर होतो फार श्रीमंत पण होतात प्रसिद्ध पण पण होतात पण फार काळ टिकतं नाहीत नंन्तर त्यांना कोणी विचारत पण नाही. कधी ढासळतात कळत पण नाही पद पैसा प्रसिद्धी सर्व लयास जाते क्षणिक सुख मिळत पण तितकंच दुःख त्यांच्या  पदरात पडत हेच  अंतिम सत्य खरं आणी सत्य बोलुन जे मिळते ते चिरकाल टिकते अबाधित राहते प्रेम असो वा कमाई, प्रसिद्धी  असो चांगल्या मार्गानेच झाली पाहिजे नव्हे केली पाहिजे.  विजय हा सत्याला मिळतो आणी मिळत असतो हे त्रिवार सत्य आहे. खोटं पचत नाही खोट्यात दुःख यातना या भविष्यात लपलेल्या असतात.  कधी तरी समोर येत असतं येणारच पण सत्य न्हाऊन सलाखुन निघत त्यालाच मान सन्मान मिळतो कोण काय करतो त्या पेक्षा आपण काय करतो कस वागतो त्यावर सारं अवलंबुन असतं हेच खरं कोणीतरी म्हटलं आहे "सत्य परेशान होता है पराजीत नहीं " आपल्या  भारताचा तर  " सत्य मेव जयते"  मंत्र आहे.  शेवटी विजयी सत्यवादि यांचाच होणार सत्य शोधण्याच नाही तर अंगीकार करण्यात आहे सारं खरं वाटेल सत्य दिसेल.





प्रदीप मनोहर पाटील 
मु. पोस्ट. गणपूर 
ता. चोपडा जिल्हा. जळगाव ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे