गुरु
|| गुरु ||
कुंभार घडवतो मडकं
शिल्पकार साकारतो मूर्ती
गुरु घडवतात समाज
त्यातून पसरते कीर्ती…
गुरु रूप अनेक
पहिली आई एक
वडील शिक्षक समाज
सारे जीवच गुरु नेक…
शिकत असतो जीवनभर
उसंत नसते कणभर
तेव्हा संचित मणभर
त्याचीच उंची काकणभर…
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
Comments
Post a Comment