विचार मग्न मन ✍️
| | विचार मग्न मन | |
मन म्हटलं की आपण हृदय छातीस हात लावतो. मग मनातून मनापासून बोलतोय असं म्हणतात. पण मन तेथे असते का? तेथे हृदय असतं मग त्यास मन का म्हणतात? असं म्हंटल जातं तेथेच जीव असतो. मग जीवाला मन म्हटलं गेलं का? तेही नाही मग जीव आहे तो पर्यंतच मन आहे. म्हणजेच जीवाला धडधडत असते तेथ पर्यन्त तेच मन. विचार तर डोकं करतं तेथे मेंदूतून निर्माण होतात विचार. मी कालच एक लेख लिहला रिकामं मन या शीर्षक खाली. आज विचार केला तर मन कधी रिकामं होतच नाही. सतत विचारात मग्न असतं. शरीर कुठं पण असो कामात असो वा निवांत उत्साही असो वा बेचैन. मग असं का म्हटलं गेलं रिकामं मन जे कधी जीव जिवंत असे पर्यन्त चालत पळत असतं कुठं पण हिंडत फिरतं असतं त्यातचं दुसरं मन त्यास आवरत असतं सतत मग्न. प्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई म्हणतात."मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर" असं म्हणतात कवी बाबत" जे नं देखे रवी ते देखे कवी " जेथे सूर्य किरण पोहचत नाही तेथे कवी विचार पोहचतात. जो विचार कोणी करू शकत नाही तो कल्पनातीत विचार कवी करतो... डॉक्टर, वकील, संशोधक ई. त्यांच्या त्यांच्या मनानं विचार करून नवीन काही करतात. याचा अर्थ मन सतत व्यग्र असतं. त्यास फक्त विश्रांती झोप आली तर मिळते.
मनातून आलेले विचार नवनिर्माण करतात. चांगले आलेत तर चांगलं निर्मितात वाईट आलेत तर वाईट कार्य घडत असतं. ईतर वेळेत ज्याच जसं कार्य त्याचं तसं त्यात अडकलं असतं. घर, राजकारण, समाज, भोवतालचं वातावरण. परिसर यात असतं. प्रत्येक जीवाचं त्याच्या कामा प्रमाणे गुंतलेलं असतं असंच. असं म्हटलं जात ते सैदीव प्रसन्न असावं. पण तसं कधी घडत नाही प्रयत्न केला तर घडत पण . जिवाच्या मनात सतत अनेक विचार घोगावत असतात. स्वता करतं असलेले उदरनिर्वाह साठी करतं असलेले कार्य यात गुंतलेलं असतं. वय प्रमाणे त्यात बदल होतं असतो असं वाटतं. लहान मुळे, तरूण, वृद्ध यांच्या वय परत्वे बदलत. जन्म ते मरण पर्यंत मनाचं कार्य सुरूच असतं असंच वाटतं आणि तेच आहे. त्यात आपण चांगले सकारात्मक विचार सदोदित पेरत गेलो तर चांगलंच घडत असतं. असं म्हटलं जातं रिकामं मन शैतान घर करतं. पण तसं नसतं त्या जीवाची वैचारिक शैली त्या विचाराची घडलेली असते म्हणुन त्याचे विचार तसे चालतात. उत्कृष्ट विचार कधीच हा विचार करतं नाहीत. जरी आलेत निर्माण झालेत तर त्यास लगेच झटकून देतात. आणि चांगली ऊर्जा दायक सकारात्मक विचार पेरणी जर सुरवात पासून झाली तर ईतर. वाईट बिभित्स कृत्य जे घडत असतात ते कमी घडतील. जे मन कधीच रिकामं राहतं नाही त्यास रिकामं मन म्हटलं गेलं हेच मला नं पटणारं आहे.. काम थांबवून विचार करणं लिहणं त्याच वेळी मनात असं काहुर माजले असते. विचारांचा कल्लोड असतो. मग आपण रिकामं मन असं कोणत्या आधारानं म्हणु शकतो असं मला वाटतं. कधी कोणी एकांतवास लोकांन पासून दुर जाऊन विचार करतं असेल तर त्याच मन रिकामं हेही म्हणु शकतं नाही. एकलकोंडं म्हणतो. याच अवस्थेत शांत विचारातून नवनिर्माण होत असते. तर कुठं मनात शैतान जन्म घेत असतो. ही तर रिकामं मन अवस्था नाही वाटतं. शोधलेला एकांत हा तारक किंवा मारक घातक ठरतो. हे झाल फुर्सतीचा वेळ. रिकामं मन नव्हे. कार्य करतं असतांना सुद्धा मन कुठं तरी गुंतलेलं असतं आणि कार्य करतं नसतांना सुद्धा मन आपलं कार्य करतं असतं असंच.
पण आज पाहतोय लिहणारे साहित्यिक आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे जे सकारात्मक पेरणी करतं असतात ते उपेक्षितच आहेत. ज्यांच्या विचारामुळे सारं चालत तेच दुर्लक्षित असतात आहेत. काय लिहतो काम सोडून आळशी कुठला असं काही जण म्हणतात म्हणत असतील. मी पाहिलं केकीमुस सारखे अंनत अनमोल विचारांची पेरणी करून गेले. त्यांची दखल मरणोपरांत घेतली गेली. नाहीतर लोकं तेव्हा तेथे राहतं असतांना वेडं वेडा म्हणत असतील घरात राहतो कधीच बाहेर न पडणारा. हे यावरून आठवलं मी ग्रामीण साहित्यिक म्हणुन गेले चार महिन्या पुर्वी सरकार दरबारी अर्ज केला. चोपडा पंचायत समिती ला अजुन पर्यन्त दखल नाही असंच निष्क्रिय सरकारी काम. साहित्यिकांची दखलच नाही मला वाटलं या निमित्ताने तरी सरकार दरबारी साहित्यिक. म्हणुन नोंदणी होईल पण..सरकारी कर्मचाऱ्यांची वृत्ती खराब असंच. हा दुसरा अनुभव. गेल्या 20 वर्ष्या पुर्वी. राज्य कामगार विमा योजना. मुबंई, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग. येथे noc.नोकरी साठी झालेली असतांना अजुन पर्यन्त कामावर हजर व्हा असं झालं नाही. भ्रष्टाचार भ्रष्ट यंत्रणा. ही झाली कर्मचाऱ्यांची काम न करण्याची वृत्ती निष्क्रियता. ते चालेल ते नोकरी करतात काम न करता. मग जी लोकं नुसतेच नोकरी पैश्या साठी करतं असतील कार्य न करता. अन्याय करतं असतील जनतेवर. मग कोणतं कार्य महान. वाईट कार्य नोकरी करून की? काही उत्कृष्ट करतात काम म्हणुन थोडं बरं आहे. त्या भ्रष्ट लोकांनी अन्याय केला म्हणुन मी लिहतोय असंच झालं. काही नोकरदार चांगले आहेत असं जर असतं तर कोणालाच ईतर हजारो माझ्या मागील मुलांना नोकऱ्या दिल्यात ते लक्ष्यात आलं नसेल का? 254 नो वर अन्याय होतो असं. चांगला माणुस पण दाबला जातो. असं असु शकतं नोकरीत सत्य कमी चालत... काही आहेत चांगले म्हणुन बरं... असंच मी म्हणेन. ही रिकामं नव्हे अंतर्मनातून फावल्या वेळातून लिहलंय. यात मन कधीच रिकामं राहतं नाही ते सदोदित कार्यमग्न असतं. त्यात माझ्यावरील अन्याय आला तो शिक्षित नोकरदार यांनी केलेला तो अनावधानाने मुध्दाम घेतला... व्यथा पण पोहचतील सरकार दरबारी... जे लिहलंय जसं सुचलंय त्यातून पटलं तर घ्यावं नाहीतर सोडावं.. जळगाव कलेक्टर प्रकल्पग्रस्त विभाग, पं सं चोपडा यांची मानसिकता तपासणी करावी असंच... सदैवं सकारात्मक सत्य विचार आचार असावेत.विचार मग्न मन सदैवं असतं असंच यातुन सुचवायचं. मन कधीच रिकामं नसतं कामातुन वेळ मिळतो मिळाला तो. आध्यत्मिक चांगला सत्कारणी सकारात्मक विचार करतं राहिलो राहिलं पाहिजे. देवाचं घर नवनिर्मितीची खाण सारखे विचार सदैवं रुजले अंगिकारले पाहिजेत....
गणपूर ता. चोपडा जळगाव
Comments
Post a Comment