राजे ✍️
| | राजे | |
शिवनेरी
जिजाऊ पोटी जन्मले
वीर पुत्र शहाजीस शोभलें...
रक्ताची
धार धरुनी
शिवलिंगी संकल्प घेऊनि
स्वराज्य स्थापन झेंडा रोवुनी...
बाराबलुतेदार
सोबती मावळे
सह्यादी जोडले सगळे
जिंकुन किल्ले बांधले वेगळे...
सन्मान
स्त्री वर्गाला
नाही थारा जातीपातीला
शुरता वीरता संस्कार रुजविला...
न्याय
निवडा अंगिकारला
मंत्री मंडळ निवडुन
राज्यकारभार लाजवेल आजच्या लोकशाहीला...
दृष्ट
मोडुन पातशाही
हरहर महादेव मंत्र
साऱ्यात भरला ठाही ठाही...
गुण
वर्णन राज्यांचे
ग्रन्थ अपूर्ण साऱ्यांचे
समर्पित थोडं लिखाण लेकराचे...
प्रदिप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ
ReplyDelete
Delete"जय जिजाऊ जय शिवराय".
मनःपूर्वक धन्यवाद आपला आभारी आहे. 👏
भारी सर 👌👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे आपला. 👏
Deleteखूप सुंदर
ReplyDelete