आई ✍️
| | आई | |
सोसला भार पोटात
रक्तानं शरीरात घडवला
दाखवली गोळ्यास सृष्टी
दुधानं जीव वाढवला.
लुगड्याची छत्री धरली
झाकुन स्वतः पदर
निर्मितीकार गुरु झाली
करतो तिचा आदर.
पोशिंदा बाप देव
आई आहे देवी
माया तिची केवढी
उपाशी राहुन वाढवी.
गुण वर्णावे किती
तुझी आहे कीर्ती
जीव वाढवला धरती
राज्य तुझे जगावरती.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©️®️

Superb sir
ReplyDeleteNice
ReplyDeleteटी.एम.चौधरी
ReplyDeleteअत्यंत अप्रतिम, कविवर्य.
खूप छान
ReplyDeleteअप्रतिम.
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप च छान 👌👌👌👌
ReplyDelete