|| गौरव मराठीचा || शुंगार मराठीचा ||
| | विषय :- गौरव मराठीचा | |
| | शीर्षक :- शुंगार मराठीचा | |
दर्जा मिळाला आईचा
बोलबाला माय मराठीचा
साज साहित्यिकांच्या लेखणीचा
गोडवा संतांच्या वाणीचा.
शुंगार दिसला कीर्तनकारांचा
गोफ ग्रामीण कलावंतांचा
कडे गुंफलं भावनेचं
दरवळ पसरला संपदेचा .
पैठणी शोभली गीतांची
रंगला फड लावणीचा
मोहित झालं विश्व
सोहळा घरोघरी मराठीचा.
अंगठी शोभली व्याकरणाची
लेखणी भारली बाराखडीची
केस शुंगार व्यंजनांचा
कला कुसर रस्व दीर्घ ची.
पैंजण गुंज गाण्यांचं
झुमका शोभला कवितेचा
तिलक ग्रंथ संपदेचा
नथ शोभली ओव्यांची.
वेणी गुंफली कथांची
गळ्यात हार विचारांचा
रिंग कानी चारोळ्याची
डोक्यावर पदर सुविचारांचा .
ब्रह्मांडी कीर्ती मराठीची
रीत शिकवली जगण्याची
बोली गोड मराठी
लावण्य शान महाराष्ट्राची.
प्रदीप पाटील ©️®️
गणपूर ता. चोपडा (जळगाव )
गणपूर ता. चोपडा (जळगाव )

Khup chaan
ReplyDeleteZakas
ReplyDelete