महादेव ✍️
!!शिव शंभु महादेव !!
हर हर महादेव
शिव शंभू महादेव!!
जीव आत्मा शिव
सृष्टी करता धरता
निर्मिता दुःख हरता
सांभाळ साऱ्यांचा कर्ता.
घर मंदिर स्मशान
स्थान तुझंच सर्वदूर
कोरडं पडतं रान
पिंडीवर पाण्याचा पूर.
मंत्र वाचवतो जीव
पावतो बाबा सदाशिव
नाम तुझंच मुखावरी
कार्य तुझंच भरीव.
मंदिर तुझेच कोरीव
शिव पार्वती रूप
सुष्म तूझं स्वरूप
निर्मितीकार तु प्रारूप.
सुख दुःखा मदती
देव दानव मानव
मेळा तुझाच भरता
क्रोध भस्म शव.
कुंभ तुझाच भरतो
साऱ्यांना तुच पावतो
देव महादेव भावतो
एकरूप सर्वात होतो.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


Comments
Post a Comment