आधुनिक संत गाडगेबाबा ✍️
!!संत गाडगेबाबा!!
संत झालेत आधुनिक
केर काढत केरसुणीत
सांगतं ज्ञान वाणीत
प्रबोधन सांगणं अगणित.
सांगितले ज्ञान विकासाचे
धडे दिले स्वछतेचे
कथा कीर्तन करतं
पाश तोडत अंधश्रध्येचे.
नको बुवा बाजी
लावु नका काजी
देव नाही दगडात
सांगतं सारं डेबूजी.
देऊ नका बळी
लावत स्वछतेची गोडी
बुवाबाजांची लक्कर वोढी
माणसं सारी साधीभोळी.
सद्विचार आचार पाळत
शिकवला लोकांना सदाचार
देव शोधला माणसात
दिला सत्य विचार.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


Comments
Post a Comment