राष्ट्रीय विज्ञान दिवस ✍️

!! राष्ट्रीय विज्ञान दिवस!!


ज्ञान एक वरदान 

तंत्रचं मिळालं छान 

 बनवलं मानवाने 

यंत्राचा वाढला मान.


लागले शोध नवीन 

अफाट झालीत यंत्र 

विसरू लागले मंत्र 

आधुनिक कलावंत.


लोकं झाली स्वश्रीमंत 

लढा लागला यंत्राचा 

अवलंबून राहता 

शीण घालतो श्रमाचा.


विसरली सारी श्रम 

सारे यंत्रा कार्यक्रम 

वापर सुरु बेफाम 

माणसं होता निष्काम.


कास धरली तंत्राची 

साथ मिळतेय यंत्रा 

शोध नवं नाविंज्ञाचा 

निर्मितीच सारं तंत्रा.


अंगीकार सर्वदूर 

शोध स्तोत्र महापूर 

झेप आकाशी येंत्राची 

सामर्थ्यांचे यंत्र सूर.©️®️



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तालुका. चोपडा 

जिल्हा. जळगाव.



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे