जागतिक पर्यावरण दिन ✍️
!!जागतिक पर्यावरण दिन!!.
जगाला काळजी ! आता हो लागली!
सारी नासवली! वसुंधरा!!
उडवी धुराडा! घालत गराडा!
गाड्यांचा हो मेळा! रस्त्यावर!!
प्रदूषण खुप! काळपट रूप!
राखेचे स्वरूप! पावसाचे!!
झाडं ते तोडतं! बोडकी जंगल!
करतं दंगल ! रानिवणी!!
नद्या नाली शुष्क ! सारी वाळू फस्त!
जीव झाला स्वस्त! राही मस्त!!
वाळवंट झालं ! काँक्रीट ते दिसें!
सूर्य तप्त भासे! आगगोळा!!
केमिकल सारं! सोडतं पाण्यात!
जीव मारण्यात! पटाईत!!
सृष्टी चक्र सारे! तोडलं मानवा!
पेटवे वनवा ! स्वतःहून!!
आधुनिक तंत्र! मारक ते यंत्र!
फिटली हो भ्रात ! मानवाची!!
पृथ्वी सृष्टी जीव! वाचवा सजीव!
करा वृक्ष कीव! वागण्यात!!
संदेश देतोय! आलाय तो दिन!
प्रदीप तो लिन! अभंगात!!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment