आई - मायेचा सागर
| | आई - मायेचा सागर | |
आई मायेचा सागर
ममतेचे असतं आगर
भरला जीवनात सार
उचलला रक्तातुन भार.
आणलं तीनं पृथ्वीवर
कळवला सृष्टी सार
जगलो तिच्या दुधावर
शतदा प्रेम जगण्यावर..
मन झालं प्रेमळ
होती तीच निर्मळ
तिनेच उचलली कावड
केला कुटूंबाचा सांभाळ
जरी तिला भोवळ
लोटला थोडा काळ
आली तिची वेळ
बसवु सारा मेळ.
नको तिला अंतर
थकलं तीच शरीर
आता उचलु भार
जाईल आपुल्या खांद्यावर.
अंनत माउलीचे उपकार
फेडु येथेच सारं
आशीर्वाद मिळतील फार
करा मन गार.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©️®️

खुपच छान मायमाऊली वरच प्रेम व्यक्त केलाय सर
ReplyDeleteमनापासून आपला आभारी आहे धन्यवाद आपले.
Deleteछान
ReplyDeleteआई वरील माया छान व्यक्त केली आहे
ReplyDeleteखूप च छान
ReplyDeleteआई ,,,जन्म दात्री चे अनेक उपकार ,, कसे फेडावे तिचे पांग
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteसुंदर रचना
ReplyDeleteअतिशय सुन्दर रचना केली 🌹🌹
ReplyDeleteमाझ्यासाठी ही कविता नेहमीच हृदयाच्या जवळ आहे
ReplyDelete