धुलिवंदन- काल आणि आज
| | धुलिवंदन- काल आणि आज | |
( संस्कार आणि संस्कृती पर्व )
रंग दिला फुलांनी
कुस्करले त्यांना मुलांनी
लावले लहान थोरांनी
उधळण विविध रंगानी…
विझवु आतबाहेरील अग्नी
उडवत धुळ्वळ सर्वानी
शिंपडू पाणी एकमेकांनी
कात टाकली झाडांनी…
वाईट सोडले त्यांनी
अंगीकार केला पूर्वजांनी
पाहुन सृष्टी सार्यांनी
बदलली दृष्टी लोकांनी…
दडला असे दृष्टिकोन
छान विज्ञान मन
चल अचल सारी
धरा अवघी रममाण…
आता टाकताय घाण
करताय रसायन उधळण
झिगताय खाऊन पिऊन
त्रासदायक सर्व काहीपण…
वाटतंय जुनं तेच सोनं
अशीच आहे म्हण
बदल हा निसर्ग नियम
योग्य ते ठेवा जपा पण…
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment