पळस ✍️
!!पळस!!
कुठंहीजा कसं पहा
पानं पळसाला तीन
बहर पळसा आला
फुलं पडता रंगीन .
रंग फुलांचे भारीच
गुल केसरी सारीच
पानं त्यांचीही हिरवी
मोठी गोलाकार हिच .
रान भासते सुंदर
बोडकी दिसता सारी
पाहुन सौदर्य पळसा
कृष्ण वाजवी मुरारी.
चाहूलहि आनंदाची
होळीत उधडण्याची
रंगात रंगु पंचमी
वेळ हिच खेळण्याची.
किमया सारी वृक्षाची
दाखवते रंग सारी
जसा शालू भरजरी
सूर्य किरणांची सरी.
तणक अंग सारेच
काळे राखाडी सगळे
खपली येते वृक्ष्याला
औषधं त्यात वेगळे.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment