विविध रूपे नारीची. ✍️
विविध रूपे नारीची
शक्ति आदिमाया रूप
सोशिक वाटे स्वरूप
तिचंच निर्मळ रूप
वर्तव्य असे प्रारूप.
काढते रोज नीर्माल्य
साथ संगत सदैव
सेवा करून साऱ्यांची
तिचंच तरी दुर्दैव.
प्रात दुपार संध्याला
कामं तिचेच सुरूच
घराला दाखवे रस्ता
तिला मानता गुरूचं.
सारा उचलते भार
प्रेम भरते जीवनी
साठते साऱ्यांच्या मनी
ममता देते पेरूनी.
आई बाई माता गुरू
भूमिका खुप साकारू
प्रेम वात्सल्य देतेच
कार्य ठेवतेस सुरु.
जननी रागिणी तीच
संस्कार मूर्तीहि हिच
देवी देवता सारीच
अवतार ती भारीच.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment