मादी नव्हे माता म्हणून बघायला शिका. ✍️
मादी नव्हे माता म्हणून बघायला शिका.महिला दिवस निमित्त.
मादी म्हणजे महिला नारी. आज सर्वदूर दुनियेत नारी फक्त उपभोग्य मजा करायचं साधन म्हणून मादी कडे बरंच बघितलं जातं असंच वाटतं. सध्या काळ खुप जोरात बदलतांना दिसतोय.आधुनिक होतोय की विकृत तेच सध्या समजतं नाही. जगात असं म्हटलं जातं. आईवडील पवित्र नातं असतं पण त्यातही सध्या खुप विचित्र घटना पहायला मिळताय. कुठं बाप मुलीला दृष्ट पणाने वागतो तिलापण सोडतं नाही तर कुठं मुलगा आई ला सोडतं नाही. तद नंन्तर भाऊ बहिण पवित्र नातं मानलं जायचं आणि जातंय . पण त्यातही भाऊ बहीण सुद्धा नरमादी नात्यात गुंततांना दिसताय.ईतर नात्यांची तर गोष्टच वेगळी कोण कोणावर सध्या भरवसा ठेवायचा हेच समजतं नाही. अगदीच अनाकलनीय गोष्टी समजतात वाचण्यात येतात. लहान असो मोठी असो भाची असो वा मुलगी असो मावशी असो वा आई नातं आज माणसं विसरतं चाललीय का? वर्तमानपत्र बातम्या बघितल्या की खुप काहीतरी विकृत घटना समोर येतांना सध्या दिसताय. लग्न झालेल्या स्रिया तरुण नात्यातील मुलानंच्या सोबत पळून जाताय. तर मुली वयस्कर पुरुष्याच्या सोबत संम्बध प्रस्थापित करतांना दिसता.ह्या झाल्या नात्यातील घटना. जेथे नातेच नाही तेथील परिस्थिती खूपच विदारक अजून. लहान असो वा म्हातारी असो फक्त मादी आहे का. दिसली की चालु पडतात काही सापडली की ओरबडतात. आज तरुणाईतली मुलं मुली तर फ्री सेक्स कडे वळतांना दिसतेय. लग्ना अगोदर सर्व करून घेऊ. मजा करायचे हेच दिवस. हि भावना सध्या कुठंतरी रुजतांना दिसतेय. विचार केला तर कुठं चाललंय सारं तेच समजतं नाही. सध्या मुली पण एक नव्हे दोन तीन लग्न करतांना दिसताय. नाही पटला सोड दुसरा कर. मुलं पण तेच करतांना दिसताय.नाही पटली सोड दुसरी बघ. काही काही समजतं नाही सध्या.कुठं कायदा महिला संरक्षण देणारा आहे म्हणून त्याचा दुरुपयोग होतांना दिसतो. तर कुठं कायदयाची पायमल्ली करतांना दृष्ट पुरुष दिसतात.कायद्याचा धाक उरलाच नाही सदृश परिस्थिती तशीच वाटते.दोष कोणाचा ते उमगत नाही. पूर्वी ची पिढी हतबल झालीय. त्यांना त्यांचे शेवटचे दिवस कसे जातील हि चिंता वाटते. तर आजची पिढी आज मजा करू ज्याला इंग्रजी मध्ये एन्जॉय म्हणताय. तेच कसं खुप करता येईल याचा सैदीव त्यांच्या मनात मनाचा अंट्टाहास दिसतो वाटतो. अत्यन्त आधुनिकता फ्री वागणं जिकडे तिकडे बघितलं तर दिसते. नाही बघितलं तर सारं काही अलबेल सुंदर हवं तसं छान सारं सुंदर जगपण खुप छान दिसतेय. जुणी जाणकार लोकं सभ्य लोकं अजून खुप आहेत. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती खुप छान शिकवण देणारी होती. त्यांचे गुण आजही सारीकडे खेड्यात तर खूपच सुदंर पिढी आजही आहे. शहरातही आहे पण ती विचार खुप मागे पडतांना सध्या शहरात दिसता.जुणी लोकं त्यांची लाख मोलाची शिकवण खुप ठिकाणी रुजतांना कुठं रुजलेली दिसते म्हणून खुप छान अजून तरी भासतंय दिसतंय.संस्कारी माणसाळलेलेली नातंगोतं पाळणारी संस्कृती जपणारी तजोमय भासते पुढील बाजु खुप छान तर येणारी मागील बाजु खूपच विद्रुप विकृत अंधःकारमय.स्वैराचारी अनाकलनीय न उमजणारी दिसते. आज महिला दिवस निमित्त लिहतांना काय लिहू महिला वर विचार करतांना सुचलेले वरील विचार. एकीकडे जगात महिला आदर सन्मान वाढतोय अगदी अंतराळात महिला भरारी घेताय. करारी वागताय. उधोग करताय.स्त्री पुरुष असा भेद न करता. एकमेकांच्या खाद्याला खांधा देतं सारं काही उज्वल करताय. आज महिला दिवसा निमित्त विशेषतः तरुणाईतली मुलांना सांगणं आहे. कोणतीही गोष्टी करतांना लोकं काय म्हणतील हा विचार अगोदर डोक्यात आणा. आई वडील भाऊ बहीण ईतर सारी नातं नाते बंधन पाळा. स्त्री भोग वस्तु नव्हे तर माता जननी आहे. तिच्या उदरातून आपण आलोय. आणि त्यांच उदरावर प्रहार कसा करायचा. याचं भान ठेवलं की झालं जग खुप सुंदर भासेल. स्वामी विवेकानंद सांगतं जगातील साऱ्या माझ्या माता बघिणी आहेत. जगात इतके सुंदर विचार त्यांच्या सारख्या चांगल्या लोकांनी आणि ईतर साऱ्या संत महात्म्यानी पेरलेले असतांना ईतर विचार आणूच नका ना. आज साऱ्या विश्वातील महिला,माता, आई बहिणी साऱ्यांना मानून त्यांचा सन्मान करायचा दिवस आपण साजरा करू स्त्री आदर करू. आदिशक्ती रूप आहे देवी रूप आहे.हेच भान सदैव मनात ठेवूयात. पुढच्या पिढीत. तरुणाईत रुजवु या हाच संदेश देतं लेख छोटाचं लिहून संपवतो.
हाल सोसले माताने
बीज घातलं पित्याने
जन्मलो यांच नात्याने
वाढतोय संस्काराने.
जाण ठेवु महिलांची
काळजी घेऊ स्रियांची
आई बहीण साऱ्यांची
इज्जत तीच घरची.
माता जननी शक्तीनं
सोसलं सारंचं स्वतः
संगोपन केलं तिनं
मानु स्त्री जातीला माता.
©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment