राष्ट्रीय सुरक्षा दिवस ✍️
!!राष्ट्रीय सुरक्षा दिवस!!
मातृभूमी रक्षा करी
सैनिकच सीमेवरी
सेवा त्यांची सदैवता
रोख त्यांचा शत्रूवरी.
अंतर्गत शत्रू फार
करता आतून वार
करू त्यावर प्रहार
मिळून त्यांचा संहार.
सुरक्षा सारीच खरी
काळजी स्वतःच घेऊ
ताण कमीच देऊत
सुरक्षित स्वतः राहू.
युद्धाची जमा सामुग्री
बंदूक ते अग्निबाण
रणगाडा तोफखाना
वर उडतं विमान.
भारत भुमाता रक्षु
कार्य सैनिका भरीव
शिल्प त्यांचंचं कोरीव
सैनिक दल राखीव.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment