जगाचा अन्नदाता ✍️
!! जगाचा अन्नदाता !!
कष्ट सारं करतो
पोट मानवाचं भरतो
जीव त्यावर तरतो
घास त्यातून उरतो.
उरलेलं स्वतः खातो
मातीत तो राबतो
व्यापारी मातीमोल भावात
पिकलेलं त्याचं घेतो.
मातीतील तो राजा
मातीमोल तोच होतो
ढेकळं फोडतो मातीचे
दुबळा म्हणून राहतो.
दयायचा असतो बळी
म्हणतात त्याला बळीराजा
फुलवता त्याची कळी
करतात फक्त गाजावाजा.
रक्त त्याचं शोषुन
दाम देतात कमी
पिकवा पीक तुम्ही
भाव देऊ हमी.
सांगुन योजना शेतकऱ्यांची
घरं भरतात व्यापाऱ्यांची
देशोधडीला लागला अन्नदाता
राजकरण्यांना नाही जनामनाची. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


Comments
Post a Comment