गाय ✍️
गुणी असते गाय
म्हणतात तिला माय
दुध तुप लोणी
पनीर मिठाई साय.
गुण तिचे हजार
देते जगण्या सार
उचलते आईचा भार
करून तिचा संसार.
तेहतीस कोटी देव
वावरतात सारे गाईत
आहे शेतकऱ्यांची ताईत
जगते शाकाहारी हिरवाईत.
खाते अन्न दान
गुणांची आहे खाण
देते गुणकारी शेण
उपयुक्त पिकवण्या धन.
मूत्र म्हणतात गोमूत्र
असतं औषधं सूत्र
आजारपणात गाय गोठा
करतात काही मित्र.
हिंदूंची आहे माता
गुणांची ती देवता
मेल्यावरही हाडं मास
असते त्यांची उपयुक्तता. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment