पळस ✍️
!!पळस!!
लाल भासतात फुलं
वाटतात आगीचा गुल
वेचतात लहान मुलं
रंगाने रंगे गाल.
पानगळ होई झाडाची
निर्मिती होई फुलांची
सुंदरता असे वनराईची
पत्रावळी होई पानांची.
बिडी बनवत पानाची
उपयुक्त आयुर्वेदिक काढ्यात
फुलं मिसळत रंगात
साल वाळवत वाड्यात.
कुठं हि जा
पळसाला पानं तीनच
म्हणं आहे पूर्वीची
शिकतं सारं मनच . ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट.गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment