इंदिराजी गांधी ✍️
!! इंदिराजी गांधी !!
झाल्या महिला पंतप्रधान
कणखर ठेवला बाणा
आणल्या नविनवीन योजना
रचला राष्ट्रीयकरणाचा कणा.
दिला पाठिंबा बांगलादेशा
छाप पाडली देशविदेशा
युद्ध पाकिस्थान देशा
सक्षम नेतृत्व भारतदेशा.
होत्या त्या गुणी
कार्य दाखवले योजनेतूनी
महंती मिळवली जगातुनी
कीर्ती पसरली विश्वातुनी.
वारसा चालवला वडिलांचा
झेंडा फडकवला देशाचा
कारभार सारा नितीचा
काळ स्वातंत्र भारताचा.
राबवले ऑपरेशन मंदिरात
संपवले शत्रू घरात
मोडला अतिरेक्यांचा कणा
त्यानेच घात जीवनात.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


छान
ReplyDelete