साने गुरुजी ✍️
!! साने गुरुजी !!
जन्म झाला कोकणात
कर्म भूमी खान्देश
ओळखत सारा देश
स्वतंत्र हा संदेश.
साहित्य लिहलं खुप
गाजलं शामची आई
सुंदर अक्षर दागिना
वापरत पेन शाई.
विना अनुदानित शाळा
करून धन गोळा
भरवत जागृती सोहळा
इंग्रज घालत खोडा.
काळ होता पारतंत्राचा
कवी लेखक साहित्यिक
लिहलं विपुल साहित्य
जगत गुरुजी वयक्तिक.
हळवं होतं मन
सद्विचार त्यांचं धन
गरिबीत गेलं पालपण
जगण्यात त्यांच्या साधेपण.
झालेत पुरुष महान
पांडुरंग सदाशिव साने
जगले संघर्ष करतं
बोधघ्यावा साहित्य वाचनाने. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment