गावातील पहिले पोस्टमन ✍️



!!वेडू आण्णा गणपूर गावातील पहिले पोस्टमन!!


आण्णा गणपूर गावातील पहिले पोस्टमन होतं. काळ होता इंग्रज कालीन. सुख समृद्धी ने नटलेला. हिरवाई ने दाटलेला. घोडा, गाडी, बैलगाडी चा प्रवास गावात होतं असे. सातपुडा पर्वत रांगा च्या पायथ्याशी असलेलं गाव. वेडू आण्णा यांचा जन्म सन 1911रोजी झाला. गावातील पहिले शिक्षक म्हणून रुजू झालेत. गावात शाळा फक्त मराठी शाळा. मराठी यत्ता चवथी पर्यंत शाळा असलेलं गाव. गावात माध्यमिक शाळा नाही म्हणून शिक्षण अभाव होता. तत्त काळात गावात निरोप देवाण घेवाण साधनं कुठलंच नव्हतं. लग्न समारंभ सुख दुखं वार्ता प्रवास करूनच दयावा लागायचा. प्रवास म्हटला तर पाई, किंवा, घोडे कमीच म्हणून बैलगाडी नेच प्रवास होई. गावात पोस्ट सुरु व्हावं म्हणून प्रयत्न करणारे आण्णा. आण्णा पोस्ट सुरु व्हावं म्हणून प्रयत्न करतं असतांना गावात शिकलेली माणसं कमी. म्हणून ज्याला लिहता वाचता येईल असे मोजकेच लोकं. गावात सुविधा तर आणायचीय तर पोस्टमन म्हणून काम करेल कोण. तर तालुक्यातील पोस्ट ऑफिस मधून अर्ज करणारे आण्णा यांनाचं सांगितले की पोस्टमन म्हणून नवीन कोण माणुस येतो तुमच्या गावात तेव्हा पर्यंत तुमीच पोस्ट सांभाळा. आण्णा यांची सेवाभावी वृत्ती. त्यांनी पुढील सोय होई पर्यंत गणपूर गावातील पहिले पोस्टमास्तर म्हणून कामकाज पाहण्यास सुरवात केली. पोस्ट सुरु झालं पण पत्रव्यव्हार कोण करणार ती एक समस्या पोस्ट आलं पण पत्र लिहणार पाठवणार कमी. म्हणून अगोदर गावात आण्णा यांनी जनजागृती मोहीम सुरु केली गावात. आपल्या गावात पोस्ट योजना सुरु झाली त्यानं तुम्ही कुठं पण आपल्या नातेवाईक यांना आपली ख्याली खुशाली सुख दुःख बातमी पत्र आंतरदेशी पत्र किंवा अर्जंट असेल तर तात्काळ तार संदेश पाठवु शकतात. किंवा कोणाला कुठं पैसे पाठवायचे असतील तर तेही पाठवु शकतात. या प्रबोधन पर सांगण्यातून गावातील जनता जागरूक होऊन. पोस्ट महत्व लोकांना पटू लागलं आणि गणपूर गावात. पोस्ट ऑफिस सुरु झालं. पहिले पोस्टमन म्हणून स्व. श्री. वेडू आण्णा हे होतं. गावात लिहता वाचता येणारे लोकं कमी म्हणून लोकांना पत्र लिहा म्हणून आण्णा स्वतः पत्र लिहून देत असतं आणि स्वतः पत्र पाठ्वत असतं. कुणाचं आलेलं पत्र वाचन करून देत असतं. हळूहळू जनता शिकु लागली अन आण्णा यांचं काम कमी झालं. मग त्यांनी आपलं गावात पोस्ट सुरु करण्याचं मनात असलेलं आपलं ध्येय गाठलं आणि गावात दुसरा पोस्ट मास्तर रुजू होई पर्यंत गावातील पोस्ट सांभाळलं. आण्णा मुळात जन्म त्यांचा गाव देश सेवेत समर्पित व्यक्तिमत्व. पहिले पोस्टमन. पहिले प्राथमिक शिक्षक, पहिले दुध संस्था चालक, पहिले माध्यमिक शाळा संस्था चालक, गावात शाळा सुरु व्हावी म्हणून सतत झटणारे व्यक्ती. गावात वर्गणी गोळा करून गावकरी यांच्या मदतीनं आणि आपल्या असलेल्या नात्यातून गावात माध्यमिक शाळा सुरु करणारे वेडू आण्णा. तसेच येस टी. बस सुरु व्हावी म्हणून प्रयत्न करणारे आण्णा. अजून पण गावातील तत्त कालीन पहिले सरपंच तानाजी पुंजु तालुक्यातील पहिले आमदार निकम साहेब यांच्या सोबत गणपूर गावात बस सुरु झाली त्याचा शुभारंभ करतांना हजर असलेले गावातील व्यक्तिमत्व तिघांचा एकत्रित फोटो उपलब्ध आहे. पहिले आधुनिक तंत्र ट्रॅक्टर, ट्रक आणणारे पहिलं व्यक्तिमत्व. पहिली गावात पाणीपुरवठा योजना यावी म्हणून गावात लोकवर्गणी गोळा करून. पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणारे. पोस्ट ते शाळा, रस्ते, धरण वरील कालवा मंजूर व्हावा म्हणून मंत्री कडे जाऊन डावा कालव्याचे जनक आण्णा. डावा कालव्याचे जनक आण्णा तर अनेर धरणाच्या डावा कालव्याच्या शिल्पकार आण्णा यांच्या मुळेच स्व. तत कालीन मंत्री आक्का सो ह्या अनेर धरण डावा कालवा मंजूर करणाऱ्या म्हणून शिल्पकार ठरल्यात. सामाजिक कार्य करणं हा त्यांचा शेवट पर्यंत स्वभाव. राजकारण करायचं नाही फक्त जिथे चांगलं असेल तेथे फक्त सहभाग घ्यायचा असंच गणपूर गावातील पहिले फलक लेखन करून प्रभोधन करणारे पोस्टमन ते वेडू गुरुजी पर्यंत चा अंतिम प्रवास करणारे आण्णा.©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे