लाजरी ✍️

 

!!लाजरी!!

मागे वळून बघते गोड हसते गोजरी

खळी गालावर पडते दिसते लाजरी


नखरे दाखवतं चोरून बघते साजिरी 

प्रेम असुन दाखवतं नाही लाजरी 


बोलतेस पण सांगतं नाही कधी 

मनात भाव ठेवतेस सखी लाजरी


डोळ्यात सांगते मज का कळतं नाही 

मनातलं तुझं ओठावर का येतं नाही लाजरी


येता जाता उडवत केस गल्लीत फिरतेस 

चोरून बघतेस रुजवत प्रेम लाजरी


जुळून आली रेशीम गाठ जरी फिरता साठ

तुझी माझ्या साठी असतेस वाट लाजरी.©️®️


प्रदीप पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे