गुरू ✍️
!!गुरू!!
जीवनात असे ! अनेक हो गुरू!
सद्विचार सुरु ! त्यांच्या मुळे!!
वेळोवेळी दिसें ! रूप त्यांचं भासे!
सारे काही असे! वागण्यात!!
अवती भवती ! देता काही तरी!
गुरू अवतारी ! सारे जण!!
ज्ञान धर्म शिके ! जीवन हो टिके!
लेखक ते लिखे !ज्ञानातून!!
जीव जीवनात ! पक्षी ते वनात!
भरे हो मनात ! काहीतरी!!
प्राणी पशु पक्षी! कोण कोणा भक्षी!
स्वतः काही रक्षी! आत्मज्ञान !!
माता पिता गुरू! सांगे काहीतरी!
देह करी वारी! संसारात!!
कधी बने स्थिती! सांगे नाती गोती!
शिकवे ते नीती! परिस्थिती!!
सारेच असता! सदैव सोबत!
प्रदीप राबत!जीवनात !!©️®️
प्रदीप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment