पैंजण ✍️



!!पैंजण!!


छमछम वाजती हे 

मन मोहक गुंजण 

ताल सूर समरण 

स्वर करी आकर्षण.


प्रेम करी ते जागृत

हृदयात हो साठवण

सदैव राही आठवण

सुमधुर ते पैंजण.


पायात तिच्याचं असे

चाल ठुमकत भासे

उमटवी प्रेम ठसे

मनात तीच हो बसे.


शांतीत पावलं पडे

समजे येतेस गडे

चालतांना सारं कळे

मोहित होतं सगळे.


पाहतं सारी बगळे

त्यात काहीचं वेगळे

वाटे निर्मळ सगळं

स्पन्दन ती वेगवेगळे.


झरा वाहे खळखळ

रान पानं सळसळ

धुंद करी ती सोज्वळ

मनी स्वर ते निर्मळ.©️®️


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर.जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे