कोण कोणाचं असतं ✍️
!! कोण कुणाचं असतं!!
कोण कुणाचं असतं
सारं जग सुंदर असतं
मन त्यात कधी फसतं
सारं आपलंच भासतं.
आई नाड जन्मताच तोडते
आयुष्य जगण्यास सोडते
नातं गणगोत जोडते
सारं आपणास कळते.
आपलंच जगायचं असतं
सारं मनसोक्त भोगायचं
साधं सरळ वागायचं
समाधान ठेवतं हसायचं .
जीव असतो तोवर
आपलं म्हणतं असतो
गेला की राखेत दिसतो
समजलं नाही तो फसतो.
जन्म दिला ज्याला
पाजतो शेवटचा प्याला
सांगतो आगीला आता
जाळ ह्या मृत जीवाला.
नाती गळा काढतात
घरी येताच खातात
जाळलं म्हणून मुलास
गोड खाण्यास देता.
सांगा बरं आता
कोण कोणाचं असतं
वाटण्या साठी सारी
भांडतांना हो दिसता.
प्रदीप पाटील.
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment