सुखी जीवनात ✍️
सुखी जीवनात
सुखी जीवनात! कोण आहे सांगा!
सर्व लावी रांगा! सुख घेण्या!!1
सर्वांना वाटतं! कमी मला दिलं!
इतकं मी केलं! सर्वा साठी!!2
कोण नेतं वर! विसरले सार!
दृष्ट कारभार! सर्वीकडे!!3
सुष्म असा जीव! देह मानवाचा!
नुसताच ढाचा! शरीराचा!!4
चित्त समाधान!ठेवा हिच जाण!
हो प्रकाशमान! उजेडात!!5
निर्मळ जीवात! सुख शांत रात!
सरस्वती साथ! आयुष्यात!!6
प्रदीप भरतो ! गोडाई मनात!
दिप अभांगत! लावतोच!!7
प्रदीप मनोहर पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment