जग काय म्हणेल ✍️अभांगत.
" जग काय म्हणेल "
चिंता असतेस! वागण्यात सारी!
मनात उभारी! जगण्याची!!1
जनता विचित्र! वाईटचं सत्र!
भाऊबंद मित्र! दोष लावी!!2
कर्तव्य करता! सद्गुणी वागा!
पकडता धागा! दोषाचाच!!3
सोडुन गुणांचा! वाचतात पाढा!
भरतात शाळा! अवगुणी!!4
पृथ्वी फिरे गोल! जीव अनमोल!
सांभाळत तोल! बोलण्याचा!!5
सुष्म आहे जीव! कार्यात भरीव!
शिल्पात कोरीव! साकारावे !! 6
असंच राहावं! तसंच करावं!
सोडून ते दयावं! जन चिंता!!7
लाभलं आयुष्य! अल्प असे क्षण!
सृष्टीत निर्माण! सुष्म देह!!8
भ्रम्हांड अफाट! प्रदिपचा थाट!
सांगतोय वाट! जगण्याची!!9
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment