जग काय म्हणेल ✍️

" जग काय म्हणेल "


जग अफाटचं आहे 

अस्तित्व आपलं छोटं 

जनता काय म्हणेल 

संकट वाटतं मोठं.


नाण्याच्या बाजुहि दोन

आपलं परकं कोण

एक चांगलं सांगतो

दुसरा ते खाई शेण.


नावं सर्वांना ठेवले 

कुणी कर्तृत्व दावले 

तेही हो हिसकावले 

कोण कुणाला भावले.


आपलं असतं प्रेम 

दुसऱ्याचा करे गेम 

अंतरंग मनातील

सर्वांचे असतं सेम.


सतत टोचता काटे 

परकं आपलं वाटे 

स्वार्था साठी दृष्ट काही 

चांगल्यास देता फाटे.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे