सौर माला आपली ✍️
सौर माला आपली
आपली ती नेक! पृथ्वी उप चंद्र!
ढगात तो इंद्र! जल राजा!! 1
पृथ्वीला वलंय! कधी तो प्रलंय!
हवेतचं लय! चक्राकार!!2
सूर्य देतो ऊर्जा! जगतेय प्रजा!
गुरु शुक्र राजा! जीवनात!!3
शनी प्रभावात! मंगळाची माला!
लाभते जीवाला! ग्रह शक्ति!!4
बुध शुक्र तारा! नेपच्युन न्यारा!
ल्पूटो तेज भरा! सांगतात!!5
नव ग्रह दिसें ! दुर्बीणीत वसे!
साऱ्यांचीचं ठसे! डोळ्यातून!!6
लहान मोठाली! खूपच भासती!
सारीच ओढती! शरीराला!!7
प्रेत्येकाची शक्ति! चक्रकार फिरे!
जीवनात भरे! आकर्षण!!8
प्रदीप कथन!अल्प अभंगात!
ग्रहाचीचं साथ! जीवनात!!9
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment