चिऊताई चिऊताई.
|| चिऊताई चिऊताई ||
कुटुंब करून राहते
बाळांना चोचीने भरवते
दुर नेऊन फिरवते
मोठी झाली उडवते…
माणुस वस्तीत राहते
खोपा घरात बांधते
आधार माणसांचा शोधते
आळ्या वेचुन खाते…
काँक्रीट झाली जंगल
घरं तिची गेली
रेंज टॉवरला आली
चिमणी बिचारी मेली…
दुर्मिळ झाल्या चिमण्या
मानवांच्याच साऱ्या करण्या
लागले दिन मनवण्या
लागतीत भोग भोगण्या…
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

Nice
ReplyDeleteखूपच छान कल्पना
ReplyDeleteसत्य आहे Nice
ReplyDelete