कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️
| | कर्तृत्ववान नारी | |
(माँ जिजाऊ)
झाल्यात अनेक स्रिया
जिच्यात असते माया
पडली कर्तृत्वाची छाया
आली संस्कृती रक्षाया...
कुलवन्त लेक झाली
छत्र छायेत वाढली
दांड पट्टा शिकली
भोसल्यांची सुन शोभली...
जुलमी पातशाही देखिली
लाचार रयत पाहिली
मनात सारी गहिवरली
खूणगाठ मनात बांधली...
अर्धांगिनी शहाजिची राणी
पुत्राची गुरु झाली
मुलास संस्कृती शिकवली
शौर्याने कीर्ती पसरली...
माता शिवरायांची जिजाऊ
जातपात सारी विसरली
गोत्र एकवटली मराठी
बलुतेदार एकत्र आली...
पुत्रानं घडविला इतिहास
आले रयतेच राज्य
राजे झाले शिवबा
माँ सायबांचं स्वराज्य...
प्रदिप मनोहर पाटिल
गणपूर ता चोपडा जिल्हा. जळगाव
©®

छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद आभार
Deleteसुंदर
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद आभार
Delete