चला जाऊया खेड्याकडे
| | चला जाऊया खेड्याकडे | |
चला जाऊया खेड्याकडे
पाहू पडलेल्या वाड्याकडे
बघु भकास बुरुजाकडे
जाऊ गत वैभवाकडे.
बघु बैलगाडी कडे
जाऊ तेथे गोठ्याकडे
जुन्या आठवणीत सगळे
आता सारं वेगळे.
गेला आता पाणवठा
धरणात पाण्याचा साठा
उजाड रान नदी
शांत बाजार पेठा.
गेलं जुनं साम्राज्य
देऊ गावकऱ्यांना धीर
सरकारी योजनांना उशीर
आधाराने बनवू खंबीर.
चला जाऊ खेड्याकडे
घालु साकडं गावदेवीकडे
सुख परतूदे इकडे
माणसं माणुसकी चोहीकडे.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

हृदयस्पर्शी
ReplyDeleteखरे आहे खूपच चागले विचार
ReplyDelete