निसर्ग अभंग ✍️
!!निसर्ग!!
स्वर्ग चं धरती ! हिरवळ सारी!
सृष्टी जीव भारी! निसर्गात!!
चल ते अचल ! वागत निर्मळ!
वाटता प्रेमळ ! जगण्यात !!
निर्मिती मातीत ! पंचतत्व सार!
उचलत भार ! सजीवांचा!!
झुडुप ते वृक्ष ! रोप ते कणीस!
खडा गोफणीस! राखतांना!!
फळ तेच बीज! गोड कडु चव!
खातात ती भाव! फळं बिया!!
सुष्म जीव कार्य! पंचतत्व त्यात!
माती जल यात!जीव सृष्टी!!
ऊन वारा पाणी! पक्षी गाता गाणी!
राज्य करे राणी! जीवनात!!
मध चाखे भुंगा! ते फुलपाखरू!
आनंदी लेकरू! सानिध्यात!!
फुलवे श्रीरंग ! लिहतो अभंग!
प्रदीप त्या संग! निसर्गाच्या!!
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922238055


Comments
Post a Comment