महाराष्ट्र माझा ✍️
!!महाराष्ट्र माझा!!
सातपुडा ते सह्याद्री
सुंदर कड्याकपारी
डोंगर दर्या भारी
माणसं एकीत सारी.
व्यथा मुबंई दरबारी
मंत्रालयात आहे भारी
व्यवसाय त्यात सारी
श्रीमंत असे नगरी.
रामायण महाभारत उल्लेख
खान्देश खांडव वन
राम कृष्णा यांच्या
पावलाने धरती पावन.
कृष्णा कोयना गोदावरी
तापी पांझरा अनेर जलधारी
शिवराय अवतार शिवनेरी
संत अभंग गाथा भारी.
मराठी बोली महाराष्ट्र भु वरी
व्हराडी अहिराणी कोकणी
बोलती त्यात सारी
बारा बलुतेदारी बोली गाणी .
संत ग्रन्थ महाराष्ट्रात
जेव्हा देश संकटात
महाराष्ट्र बाणा ताट
देशाला दाखवे वाट.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.
मो. 9922239055

Comments
Post a Comment