कृषी सेवा केंद्र की शेतकरी लूट केंद्र. ✍️
!!कृषी सेवा केंद्र की शेतकरी लूट केंद्र.!!
सेवा नाही लूट करायला परवानगी असलेलं ठिकाण. म्हणजे कृषी सेवा केंद्र असंच वाटतं. आज कापुस बियाणं घेण्यासाठी गेलो असता. कापुस बियाणं एक 450ग्रॅम. म्हणजे सुमारे अर्धा किलो पेक्षा कमी असलेली बियाणे पिशवी. हि एका पिशवी चीं किंमत आज नुऊशे( 900) रुपये किमतीला मिळाली. मागील वर्ष्या पर्यत 750 रुपये पर्यंत मिळतं असलेली थैली आता 900 रुपयात विकली जातेय. मी दुकानदार यांना सांगितलं की शेजारच्या जिल्यात आठशे पन्नास रुपयात कुठलं पण वाण घ्या 850 रुपये किंमत आहे. जळगाव जिल्यात पन्नास रुपये जास्त का? तर त्यांच म्हणणं होतं आमची काल जिल्यात मिटिंग झाली.बियाणं कंपनी चीं. कोणीही 900 रुपये किंमत पेक्षा कमी किमतीत बियाणे विकायचं नाही. जो दुकानदार ठरलेल्या किंमत पेक्षा कमी किमतीत विकेल त्याच्यावर कंपनी कडक कार्यवाही करेल. याचा अर्थ लुटा जास्तीत जास्त किंमत घ्या पण कमी किंमत मध्ये कोणता दुकानदार कमी भावात विकेल ते चालणार नाही. हि कुठली नीतिमत्ता आली बियाणं कंपनी मालकांची . जास्त वसूल करा पण कमी पैसे घेतले तर चालणार नाही. हा तर आमच्या कडील शेतकरी भाषेत शुद्ध हरामखोर पणाचं. असो हे झालं किरकोळ विक्रीते बाबत त्यांच्या बाबत बियाणं विक्री कंपनी नी ठरवलेलं धोरण. त्याहून कळस यांचे तर खूपच भयानक शेतकरी लूट षडयंत्र असंच वाटतं. उदाहरण म्हणून सांगतो एक क्विंटल कापुस हा शेतकरी कडून आज पर्यंत साधारण भारतातील सर्वात जास्त भाव हा सुमारे दहा हजार रुपये क्विंटल हा आहे. शेतकऱ्यांना आज पर्यंत मिळाला नाही आज पर्यंत तरी आपण दहा हजार रुपये किंमत असलेला कापुस हा एक क्विंटल घेतला त्यात सुमारे साठ किलो सरकी बी मिळतं. म्हणजे दहा हजार रुपये किंमत असलेला कापुस मधून बियाणे हे साठ किलो मिळते. साठ किलो फक्त आपण सरकी किंमत धरली तरी सुमारे अंदाजित एक किलो सरकी हि 166.66 रुपये किंमत येते.
अर्धा किलो (500ग्रॅम)फक्त 83 रुपये. बियाणे कपंनी फक्त 450 ग्रॅम कापुस बियाणे हे पिशवीत भरते. म्हणजे सुमारे जगातील सर्वात जास्त बाजारमूल्य भाव पकडला तरी 450 ग्रॅम बियाणं हे फक्त70 रुपये. ते 80रुपये. मूल्य असतं. या उपर जास्त किंमत असूच शकतं नाही. आपण कंपनी प्याकिंग खर्च व ईतर सर्व खर्च मिळून सर्व हा 20 रुपये घेतला तरी. बाजारात कंपनी ने होलसेल विक्रीत्याला शंभर रुपये मूल्य भावात मिळायला हवं. आणि किरकोळ व्यापारी यांनी सुमारे 125 ते 150 रु. च्या आतील किमतीत शेतकऱ्यांना बियाणं मिळायला हवं. पण कंपनी, होलसेल व्यापारी, कृषी केंद्र चालक, कंपनी करतं असलेली जाहिरात, कंपनी करतं असलेला अफाट खर्च. अफाट नफा सर्वांना वाटतं असल्यामुळे सर्व घटक मजा करतांना दिसतो आणि शेतकरी रडतांना दिसतो. संकरीत वाण आले आणि शेतकरी नागवला जातोय हेच सत्य आहे.सर्व शेतकरी वर्ग कडून सर्व लुटतात सर्व जण शेतकऱ्यांना लुटून वर त्याचीच मजा हिच मंडळी घेते. शेतकरी विश्वास ठेवण्या सारखे नाहीत त्यांना पिकत नाही तर रडतात. लुटणारे म्हणतात शेतकरी वेडा आहे त्याला वेडं बनवा आणि कमवा. असंच सारं दिसतंय. याची उलट बाजु आपण तपासणी करून पाहु. सरकारी कृषी मूल्य आयोग हे जर बियाणं किंमत 2000 रुपये किलो सरकी किंमत ठरवत असतील तर. शेतकऱ्यांचा कापुस हा कोणत्या आधारावर कापुस हमी भाव सहा ते सात हजार रुपये एक क्विंटल हा भाव ठरवत असेल कुणास ठाऊक. मला वाटतं सरकारी कर्मचारी नाही तर सरकार मधील व्यापारी दलाल हे. शेतकरी लवकर फासावर कसे पोहचतील हेच बघतं असली पाहिजेत. आपण 450 ग्रॅम कापुस 900 रुपये किंमत तर 1000ग्रॅम =1kg. ला 2000 रुपये किलो सरकी किंमत 60kg.सरकी किंमत 120000 एक लाख वीस हजार रुपये. रुई 40 kg ची किंमत न पकडता. हा भाव व्यापाऱ्यांना ठरवताय तर तोच भाव शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाला पण मिळायला हवा ना हो. माय बाप सरकार? कोणत्या आधारावर माय बाप सरकार म्हणायचं तेच समजतं नाही. सापा सारखं रंग बदलणारे सरडे सरकार की शेतकरी रक्त पिपासू सरकारी धोरण. सरकार कुठलं पण असो धोरण हेच आहे. शेतकरी मारणं आणि सर्वांची घरं भरणं. पूर्वी पासून कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातंय. याचा अर्थ सोनं ज्यां किमतीत होतं त्यांच किमतीत शेतकऱ्यांचा कापुस विकला जायचा. आज कंपनी या त्यांच भावानं कापुस विकताय तर तोच भाव एक लाख वीस हजार पर्यत शेतकऱ्याची पिकवलेल्या शेतकऱ्यांना पण मिळायला हवा ना माय बाप सरकार? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला म्हणे तु फाशी जाय? हि दृष्ट भ्रष्ट नितिमूल्य शून्य सरकारी सरकार धोरण. व्यापाऱ्यांची नुसती सरकी किंमत 2000 किलो सरकार सांगत असेल तर शेतकऱ्यांची रुई धरून आमची रुई फुकट जरी फुकट्या लोकांनी घेतली तरी सरकीला व्यापारी साठी जो भाव ठरवला तो भाव 2000 दोन हजार रुपये किलो आमचा पण कापुस दयावा आणि सरकार ने हमी भाव कापसाला. 2000एक kg. कापुसाला दर का ठरवू नये? सरकार ने.म्हणजे एक लाख वीस हजार हो हमी भाव कापसाला दया? आणि मग बियाणं 2000 किलो ने विक्री करायला परवानगी दया? बिनडोक व्यापारी सांगतील तसं शेतमाल किंमत आणि बियाणं किंमत ठरवणारे सरकारी अधिकारी.
हे झालं फक्त कापुस बियाणं संधर्भात. तसंच मका हा वाण मका आज बाजारात साधारण ता अंदाजित एक क्विंटल हा दोन हजार(2000रुपये )रुपये किंमत ला विकला जातोय आणि त्यांच मक्याचं बियाणं फक्त चार किलो दोन हजार रुपये(2000रुपये) मध्ये विकलं जातंय. या वर्षी मला माझा एक मित्र जो बियाणं विक्री मध्ये एक कंपनी बियाणं विक्री मार्केटिंग चं काम करतोय. त्याला खाजगीत विचारलं भाऊ एक मका बियाणं पिशवी तुमच्या कंपनी ची तुम्ही दुकानदार ला काय किमतीत देता.तो म्हटला दादा कुणी सांगणार नाही पण तुमच्यावर विश्वास म्हणून सांगतो फक्त पाचशे रुपयात एक मका बियाणं पिशवी आमची कंपनी देते. दुकानदार सुमारे सतराशे ते दोन हजार मध्ये बियाणं कृषी सेवा वाले विकतात.आयकून माझं डोकं गरगर करायला लागलं. इतकी मोठी लूट शेतकऱ्यांची. पाचशे रुपये किंमत ला मिळालेलं बियाणं दोन हजार पर्यंत शेतकऱ्यास विकणं. काय म्हणावं आज बाजारात सऱ्हास लूट सुरूय शेतकऱ्यांची .सर्व घटक लुटतात शेतकऱ्यांना.या वरून दिसतं.
बियाणं बनवणाऱ्या कपंन्या ह्या काय सोनं लावुन बियाणं बनवण्या साठी कापुस, मका पेरत असतील काय?
त्यांच शेतकऱ्यांना कापुस मका बियाणं किंवा ईतर शेतीला लागणारे पिकं यांचे बियाणं प्लॉट देउनच बियाणं तयार केलं जातं ना?मग शेतकरी यांना यांच्या मालाला भाव नाही आणि त्यांच शेतकरी यांनी बनवलेलं बियाणं कंपनी मालाला. थैली भरून कंपनी आपल्या नावानं लुटत असते असंच. शेतकरी लुटायचं धोरण आणि स्वतःच्या घराला बांधायचं तोरण. अहो तुमी तोरण अवश्य बांधा कुणाला मारून तुमच्या घरचं तोरण फुलणार असेल तर. तुमचं कमवलेलं फार काळ टिकणार नाही. एक दिवस सर्व ढासळून जाईल सारं.नीतीभ्रष्ट झालीत सारी शेतकरी वर कमाई करून त्यांना लुटून कमाई करणारी. जो कमी दराने विकेल तो शेतकरी कैवारी असं माझं मत. पण येथे संघटित गुन्हेगारी करून धाक दडपशाई वापरून मिटींगा बोलवून किंमत वाढवत असतील व्यापारी कंपनी. तर सरकार काय करतंय. यांच्यावर नियंत्रण सरकार ठेवणार कधी. सरकार मध्ये मी मांडलेले मुद्धे सरकार मधील बियाणं किंमत ठरवणारे का बघतं नाही की शेतकरी लुटा जास्तीत जास्त नागवा असंच सरकार ला पण वाटतं असलं पाहिजे. आज फक्त कापुस आणि मका बियाणे त्याच्या किंमत विषयी शेतकरी भावना मांडल्या ईतर पिकं आणि बियाणे यांचे याचं पद्धतीने सारं गणित असतं. गहू ज्या भावात एक क्विंटल शेतकऱ्यांना मिळतो त्या भावात 20 kg बियाणं मिळतं. सुमारे दहा हजार रुपये भाव व्यापाऱ्यांना आणि दोन हजार शेतकऱ्यांना. ई.सर्व पिकांचे असंच . खत, औषधं, बाबत सुद्धा असंच .याच दुकानदार, कंपनी कडून होणारी लूट होताना दिसते. तरी सर्व शेतकरी यांनी जागृत होऊन शेतकरी संघटना यांनी वरील मांडलेल्या मुद्धे सरकार पुढे मांडून भांडून बी बियाणं, औषधं, खत यावर शेतकरी हित धोरण सरकार ला जागं करून काहीतरी शेतकरी लुटीचा मार्ग थांबवावा. हिच शेतकऱ्यांची भावना आज आपल्या पर्यंत पोहचवत आहे. सर्व नाही पण खूपच कृषी सेवा केंद्र गावा गावातील पण या लुटीत सामील काय म्हणावं या अक्षम्य पापाला.कृषी केंद्र मधूनच शेतकरी कृषी वस्तु खरेदी करतं असतं म्हणून कृषी केंद्र लुटीचे केंद्र म्हटलं त्यांनी राग मानु नये?
.तर कृषी सेवा नावाला साजेसं कार्य करावं.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव.

Comments
Post a Comment