चित्र काव्य ✍️



!!चित्र काव्य!!

साधी राहणी उच्च विचार सरणी 

 लोकं होती पूर्वी धोरणी 

दाखवतं आपल्या कार्यातूनी 

करतं जागृती सर्व समाजातूनी.


देश आपला होता गरीब 

अन्न वस्र निवारा मिळावा

सर्व जनतेला आपल्या

चालवत चरखा संदेश कळावा.


स्वदेशी वापरा विदेशी घालवा 

वस्र कमी नेसत स्वतः 

कापुस कातून खादी देतं 

सत्य अहिंसा मार्ग दाखविता.


बापु झाले राष्ट्र पिता 

झोपडीत राही  नेता 

झाले गरिबांचे दाता

सर्वा सनमती दे पुरस्कर्ता.


 रघुपती राघव राजाराम 

पतीत पावन सीता राम

गाळत चरख्यावर घाम

नियमित करतं स्वतः काम.©️®️


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर चोपडा

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे