बैलपोळा ✍️
!! बैलपोळा!!
सण बैल पोळा ! सुंदर सोहळा!
गाव होतं गोळा ! सणा साठी!!1!!
गोड धोड खाणं ! सजवता छान!
असतोस मान ! बैल पोळा!!2!!
खिल्लारी हो जोडी ! करे काम भोळी!
शेती कसे काळी ! राबतांना!!3!!
मित्र असे हाच ! कष्ट पाचवीला!
असे संगतीला! रानावना!!4!!
शेती माती नातं ! बीज पामरात!
ये हिरवाईत ! शेतातील!!5!!
जीव सारी जगी ! राब राब राबी!
शांत तरी वागी!दिनरात!!6!!
चौखूर उधळी ! जोडी ती खिल्लारी!
करी काम भारी! बैल जोडी!!7!!
प्रदीप पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment