नारळी पौर्णिमा ✍️
नारळी पौर्णिमा
सण श्रावण महिन्यातील नागपंचमी नंन्तर येणारा पहिला सण. पौर्णिमेला येणारं जीव जीवन सृष्टी मधील एक महत्वाचं पर्व. तसं पाहिलं तर मुळात श्रावण महिना हा देवाला अर्पण केलेला महिना. महादेव भोळा शंकर पार्वती यांना समर्पित असलेला महिना. या महिन्यात पृथ्वीवर जुन, जुलै मध्ये अती पाऊस पडतो. सर्वत्र चिखल गाळ साचलेला अश्या दिवसात. ऑगस्ट महिन्यात थोडं ऊन सावली श्रावणधारा अल्पश्या बरसत असतात. पूर्वी शेतकरी यांचं जुन महिन्यात पेरणी झाली की मग ती सर्व प्रकारची अगदी अनादी काळ पासून शेतकरी हा बी पेरत असे. रानात अन स्व मनात. अगदी स्त्री राज्य होतं प्राचीन काळ पासून स्त्री सुद्धा जुन महिन्यातच योग्य पेरणी करून घेत असे. शेती शोध हा स्त्री राज्यात स्रियांनी लावलाय असं. निस्पन्न झालंय. पहिली बी पेरणी लहानसा जीव मुंगी इने शेती सुरवात केली असं म्हटलं जातं. बुरशी पेरणी च्या जाती विकसित करून मुंगी बी पेरत असे. असं सांगितलं जातं. पहिली शेतकरीण मुंगी. मग माणसातील स्त्री हि पहिली शेतकरीण. हेच सत्य आहे. शेती रानात करे त्यांच बरोबर मनात सुद्धा रुजवत असे. योग्य जोडीदार निवडून स्वतः सुद्धा पेरणी करून घेत असे. वर्ष्यातून एकदाचं. असंच सर्व जीव सृष्टी मधील प्राणी मात्रा यांच्या माद्या आपली आपली पेरणी नवं वर्ष जुन महिन्यात करतं असतं. जमीन स्थल, जल, आकाश यातील सारी जीव जीवन सृष्टी हि या पावसाळ्यात आपली शेती आणि स्व निर्माण निर्मिती करतं असे. अश्या या निर्माण निर्मिती काळात. वेगवेगळी बंधन सर्व प्राणी मात्रा, जीव सृष्टी मधील सारेच पाळत असतं. मग चल जीव असो वा अचल जीव असो. गीता धर्म ग्रन्थ सांगतो "जीव जीवश्य जीवनम " जगात असं कोण नाही जगु शकतं. जे जीवन जगतांना आपलं जीवन जगणं दुसऱ्या जीवाचा जीव घेऊनच जगावं लागतं. मग ते शाकाहारी का असे ना? शाकाहारी म्हणजे चल जीव नं खाता अचल, वृक्ष झाडपाला, फळ, फुलं, भाजीपाला हा सुद्धा अचल जीव आहे. त्याला मारूनच जीव जीवन जगत असतात. शाकाहारी म्हणजे जीव नं मारता जगणं असं नाही. तर चल जीव नं मारता अचल जीवांच्या वर जगणं म्हणजेच शाकाहार. शरीरात असलेल्या पेशी सुद्धा आपली वाढ घट शरीर सुद्धा अतिक्रमण मार झोड करतच करतं असतो. असो विषय वेगळा आहे. त्यावर नंन्तर बोलेनच. पृथ्वी वरील सारी जीव जीवन सृष्टी हि या काळात. आपलं आपलं जीव जगण्याचे वाढवण्याचं कार्य करतं असते. या काळात काही बंधनं साऱ्या सृष्टी नं घालून दिलीत. गर्भ धारण केलेली माता कुणीही मारू नये. जीव कुठला पण असो जी गर्भ धारी असेल तिला कोणताच जीव मारत नाही अन खात नाही. जमिनीवरील, जमिनीखालील असो वा जलतील आकाशातील असो. सुष्म ते अती सुष्म असो वा शरीर धारी. पशु, पक्षी, प्राणी, किटाणू असो. साऱ्यांना बंधनं होती अन आहेत. पण माणुस ती विसरला ती विसरू नये म्हणून. काही धार्मिक अंग देऊन काही जीव जीवन संगोपन वाढ हि सृष्टी मध्ये व्हावी हा मुख्य हेतु. नारळी पौर्णिमा नंन्तर जल प्राणी यांचा प्रजनंन काळ संपलेला असतो. लहान लहान जीव अवतरलेली असतात. सर्व जलातील जीव माद्या ह्या गर्भ धारनेतून मुक्त झालेल्या असतात. नर मादी स्वछन्द पणे आपल्या येणारी पीढीची वाढ करून मोकळ्या झालेल्या असतात. म्हणून मोठी नर मादी आता मेली तरी चालतील असंच सांगणं. म्हणून शिकार करायला सुरवात काळ. म्हणजे नारळी पौर्णिमा असंच मी म्हणेल. जलातील, जलाशयातील जलचर प्राणी खाण्यास सुरवात करण्याचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा.
समुद्राला नारळ अर्पण करतं. जल जीवन चक्रातील जीव खाण्यास सुरवात करण्याचा काळ. नारळ का तर नारळ हे जीव सृष्टी मधील असं फळ आहे. त्यात नारळाच्या अंतरंगात फळाच्या आत पाणी असतं. नारळ फळ हे भरून आलेलं असतं. तोडणीला फळं त्याची आलेली असतात. म्हणजेच जीव जीवन चक्रातील झाडाचे प्रजनंन काळ पूर्ण होऊन त्याला पुढील येणाऱ्या पिढी साठी बीज रुजण्यासाठी सज्ज झालेलं असतं असंच वाटतं म्हणून त्यांच फळ तोडून अर्पण केलं जातं. दुसरीकडे रुजण्यासाठी असंच. असंच जल आणि स्थल जीव जीवन चक्र असतं. साऱ्यांना बंधनं होती आजही कुत्रं, मांजर, पशु, पक्षी, प्राणी सारी आपली आपली बंधनं पाळत जीव जीवन जगताय. त्यांचा जो काळ असेल तेव्हाच ते सारं काही करतात. यावर लिहण्या सारखं खुप आहे पण वेळ अभावी येथेच थांबतो. पण जाता जाता याचं दिवशी रक्षाबंधन हा सण आला अन येतो.त्या विषयी बोलु काही. भाऊ बहीण नातं पवित्र नातं. वरील सांगितल्या प्रमाणे गर्भार स्त्री रक्षण जबाबदारी भावाची असते असंच मी म्हणेल. पण त्या काळा साठी सुरु झालेलं सण पर्व नंन्तर अनंत कथा आल्या. भाऊ बहीण पवित्र बंधन. अगदी इंद्र यांची पत्नी इंद्रानी इने इंद्र युद्धात पराजीत होऊ नये. रक्षण व्हावं म्हणून धागा बांधला, कृष्ण यांची मानलेली बहीण द्रौपदी हिने हाताला जखमेवर साडीचा धागा बांधला, एकाने इंद्र पती ला सांगितलं माझं रक्षण कर तुझं पण या धाग्याने रक्षण होईल बंधन वचन पाळ, दुसऱ्या नात्यात भावाला बहिणीने सांगितलं पवित्र नातं वचन पाळ. अश्या धार्मिक कथा आहेत. भाऊ बहिणीचं रक्षण करावं ते रक्षाबंधन. असो पुढील लिखाणात यातील अंश घेऊन सृष्टी पर्वात लिखाण करतांना घेऊ.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment