जोडी बैलाची ✍️

 जोडी बैलाची


मोऱ्या भुऱ्या जोडी ! हाके गाडी वेडी !

कामाची हो गोडी ! या बैलांना!!1!!


शेती कसे भारी! अन्न मिळे तरी!

मालक हो मारी ! हाकतांना!!2!!


शेतात राबता ! जीवन चालतं!

शोषण ते होतं! मालकाचं!!3!!


मित्र शेतकऱ्या! चौखूर उधळ्या!

गोष्टी साऱ्या खऱ्या! शेतातल्या!!4!!


अन्न दाता दोघं ! खाणं होतं मग!

रक्त पिता सारे! पोटभर!!5!!


फास मालकाला! घास तो जगाला!

बैला सारखाच! आला गेला!!6!!


व्यथा खुप साऱ्या! सणाला सांगतो!

अंतर मनाला! समाधान!!7!!©️®️


प्रदीप पाटील

गणपूर जिल्हा. जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे