जैसे ज्याची कर्म. ✍️
जैसे ज्याची कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर
कलियुगी सारे विसरले ही ओळ!!
अरे नका कुणाचा झळ, मन ठेवा निर्मळ
मनात फुलवा कमळ, सुगन्ध सार दरवड
दीन दुःख जाणा, आनंद त्यात माना
सेवा माता पित्याची, ईश्वर तेथेच जाणा.
नको कुणाला मारू, नका बनूत वळू
कळ्यां नको ओरबाडू, नातं पवित्र जोडु
जीवन गोड कडु, रक्त पिपासू नका बनु
अभ्रू लक्तर नका वोढू, वासना सारी सांभाळू.
सृष्टी उचलते भार, त्यात लावु हातभार
अन्न मिळे पोटभर, ठेवा आरोग्य निर्मळ
नको तोडू झाडं, कळ्यांची करू वाढ
दृष्टी सृष्टी सारी, देव नाम फक्त वारी.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment