आजची तरुणाई ✍️
आजची तरुणाई
आज तसं पाहिलं तर आजची तरुणाई. खुप हुशार, शांत, संयमी, चिंतनशील, होतकरू, मोबाईल, ल्यापटॉप वर सतत काम करणारी.कुठलं पण क्षेत्र असो. डॉ, वकील, इंजिनियर, सायंटिस्ट, विविध कपंनी मधील काम करणारी वर्कर असो वा. या सह. स्वतःचा उधोग करणारी. अशीच जीवन जगतांना.जीवनातील जीवन जगायचं कसं याचं कार्य क्षेत्र. आपलं आपलं क्षेत्र निवडून. आपल्या आपल्या क्षेत्रातील सतत आपल्या कार्यात मग्न.भविष्य सतत चिंता करणारी. आपल्या आनंदात जीवन जगणारी. आईवडील पालक यांचं नाव काढणारी अशीच आहे. सतत विचार मग्न कामात व्यस्त. कुठल्याही कामात सातत्या ठेवणारी. कार्य तत्पर अशीच आहे. वेळीची शिस्त पाळणारी पिढी. अशीच धावपळ करतं पण शिस्तप्रिय. कुठं थोडी खेळकर.कुठलं पण कार्य क्षेत्र निवडलं.त्या कार्यक्षेत्रात. मान शान उंचावत भरारी घेणारी तरुणाई दिसते.आज आपण बघतो. अगदी लहान लहान मुलं सुद्धा खुप हुशार आहेत.अफाट बुद्धिमत्ता क्षम अशीच आजची तरुणाई दिसते. सर्व सर्व क्षेत्रात आजची तरुणाई भरारी घेत आकाशात झेपवणारी सारी सारी क्षेत्र पादाक्रांत करणारी अशीच आहे. विशेष बाब म्हणजे मुलगा, मुलगी भेद नकरता. एकत्र वावरणारी सुविचारी अकोप्यात राहणारी. जातीभेद नं पाळणारी अशीच दिसते. स्त्री पुरुष समान राहणारी उच्च विचार सरणी अंगीकार करणारी अशीच तरुण आज दिसतात. श्रम,कष्ट करतं परिस्थिती शी झगडत.योग्य सन्मार्गाने पैसा मिळवतं. तरुणाई उधोग आपला व्यवसाय किंवा नोकरी करतांना दिसते. आपलं यश मिळवण्यासाठी झटणारी झपाटलेली तरुणाई दिसते. या माणसांच्या अथांग सागरात. आजच्या तरुणाई ने खुप चांगला ठसा उमटवला आहे असंच वाटतं. गाड्या बंगले उधोग, नोकरी व्यवसाय करतं अफाट सुख, शांती,धनसंपत्ती मिळवण्यासाठी तरुण झपाटलेली दिसताय. खूपच छान.सुंदर असं उजव्व्ल भविष्य चित्र सध्या तरी दिसतं. ते करतं असतांना. आपला आपला जोडीदार स्वता निवडणारी. आईवडील, गुरु,समाज, जनतेचा विचार करणारी खुप कर्तृत्ववान अशीच अभिमानाने सांगावी अशीच तरुणाई दिसते. अमाप बुद्धिमत्ता वापरून वापर करतं.अमाप धन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतांना दिसणारी तरुण पिढी आज डोळ्यासमोर मला तरी दिसते. अश्या अनंत गोष्टी छान सुंदर तरुणाई आज आपण बघतोय. या सह सोशल मीडिया योग्य वापर करणारी. फेसबुक, युट्युब, एक्स, इं्टाग्राम, ई. अनेक सोशल साईट वर सुद्धा आपला व्यवसाय करणारी तरुण आज खुप दिसताय. ये आय. (Ai) आधुनिक तंत्रज्ञान वापरत. उधोग करतांना तरुण दिसताय. आपली आपली कला साजर करतं सुद्धा पैसा कमवताना तरुण दिसताय. अंनत योग्य मार्ग अवलंबुन आजची तरुण जागृत होतं योग्य सन्मार्ग निवडतांना यश शिखर गाठतांना आपल्याला दिसताय. अगदी खेळ उत्तम दाखवतं. जागतिक स्तरावर आपला कीर्तिमान प्रस्तापित करतांना आज तरुण दिसताय. हि झाली आपल्या तरुणाई ची जमा बाजु. आज चांगल्या उत्तम होतकरू तरुण यांची कथा यशोगाथा खुप होतील आहेत. यश शिखर गाठत असतांना. तरुणाई ला घरदार सोडुन बाहेर पडावं लागतं. आईवडील कुटुंब पासून लांब राहावं लागतं. जगातील कुठं पण जाण्यासाठी आज तरुण उत्सुक आहे. कोठे पण जाऊन आपली छाप तेथे पाडण्यासाठी सज्ज झालाय आज तरुण. पृथ्वी वर कोणत्याही कानाकोपऱ्यात जायची आज तरुणाई तयार आहे.देश, धर्म, पंथ, जात, विसरून कुठं पण कोणत्याही माणसात राहायला. आज तरुण तरुणी आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी तयार आहेत.हि सुंदर वस्तुस्थिती आहे. नाण्याची एक बाजु खुप छान आहे. जगात या सद बाजूची छाप आहे. पद, पैसा,सत्ता, संम्पती मिळवण्यासाठी योग्य मार्ग निवडतांना तरुणाई दिसते.
छाप्यात एक बाजु अत्यन्त सुदंर आहे. अप्रतिम कार्यकुशल, सत्वशील,अपार मेहनती, अशीच शांत,सोज्वळ, हुशार अशीच आज बघतोय तरुणाई बघतोय. 80% तरुण यात मोडतात.
पण दुसरी बाजु थोडी कमकुवत आहे. वृद्ध जनतेच्या दरबारात मात्र तरुणाई त्यांना भरकटलेली वाटते. छोटं कुटुंब या नादात आपण त्यांना खुप लाडात वाढवलं. पंख फुटून हवेत उडतांना पाखरं लांब उडतं गेली. त्यातली वरील प्रमाणे खुप तरली. उंच भरारी घेऊ लागली. एकटी एकटी पोरं लांब राहु लागली आपलं विश्व निर्माण करतांना. येणाऱ्या अंनत अडचणीत मात करतांना कधी कुठं कोण अपयश आलं. अपयशी ठरली ती तरुण थोडं भरकटली असं वाटतं. चिडचिड पण, रागीट, लवकर संताप व्यक्त करणारी. आदळ आपट करणारी. विश्व प्रादाक्रांत करतांना. घर विसरू लागली. घराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आईवडील इकडे तर पोरं खुप लांब पलीकडे असंच बहुताऊंश झालं असं वाटतं. त्यात काही व्यसनाधीन झाली. संस्कार संस्कृती विसरली. थोडया पैश्या साठी काहीपण कृत्य करण्यासाठी तयार असलेली. अशी काही तरुण थोडी दिसतात. असो पण वरील सारं चांगलं बघितलं तर असं वाईट इतकं नाहीच तरुणाईत. असंच मला वाटतं.
मी आणि माझ्या करंदीकर कुटूंबा कडून. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली पर्व जसं प्रकाशमय झालं. अगदी तसंच आपल्या साऱ्यांच्या जीवनात. या पुढील आयुष्य सुख, समृद्धी, आरोग्यमय, धन, धान्याने भरलेलं असो याच प्रार्थना ईश्वर चरणी करतो. ©️®️
प्रदिप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment