ध्येयाविना.. व्यर्थ जीवन
विषय :- ध्येयाविना.. व्यर्थ जीवन -प्रदिप मनोहर पाटील
या सर्व जीवात माणुस प्राणी म्हणजे आपण अपवाद आहोत आपण आपल्या सोयीनुसार जीवन जगतो ईतर प्राणी सारखेच आपले आहे. पण तरी आपण आपल्या बुद्धीमत्ते नुसार सर्व प्राणीमात्रावर राज्य करू पाहणारे आहोत.. अगदी पृथ्वी, पातळ, आकाश यावर राज्य करू पाहतोय त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पण आपण स्वतः कुठं आहोत हे आपण शोधलं पाहिजे आणी आपण आपलं अस्तित्व आपले साम्राज्य कसे उभ करतोय करू पाहतोय जगतोय त्यात आपलं उदिष्ठ हे अप्रतिम अगदी लोकांन पेक्षा वेगळं असावं असं मला वाटते. म्हणजे सर्वसामान्य लोक जस राहता जगता त्या पेक्षा आपले ध्येय उद्दिष्ट वेगळे असावे जे दुनियेच्या नजरेत भरावे असं. जीवन जगताना अनेक अडचणी येतं असतात. पण त्यावर मात करून करून दाखवेन असं राहावं अगदी मासा जस पाण्याच्या प्रवाह विरुद्ध पोहतो आणी आपल्या सुरक्षित स्थळी पोहचतो जर प्रवाह बरोबर पोहत राहिला तर समुद्रात फेकले जाण्याची भीती असते. काही पक्षी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडत असता.आनी आपला अपेक्षित पल्ला गाठता असो स्वप्न मोठी असावीत अगदी वेडी स्वप्न का असेना नव्हे असावीच जसं विमानाचा शोध लागण्या पूर्वी लहान शोध कर्त्याने आपण असे पक्षी उडता तसं उडालो तर त्या दिवशी त्यास लोकांनी वेड्यात काढले असेल त्याने ते स्वप्न पाहिले म्हणुन शोध लागला पण आपल्या आवाक्यातील असावं असं स्वप्नं पाहावं आणी ते साकार करताना कुणी दुखावणार नाही नं दुखवता जीवन जगुन साकार करावे असे स्वप्न असे असावे कीर्तिवंत व्हावे जसं "जे ना देखे रवी ते देखे कवी " जसं जे कुणी पाहिले नसेल ते पाहावं आनी आपल्या उद्दिष्टात सफल व्हावं ज्यांनी स्वप्नं पाहिले तेच नामवंन्त कीर्तिवंत झाले. थोर महात्मे शूर योद्धे ,
संशोधक विचारवंन्त गणले गेले..ध्येय वीन व्यर्थ जीवन .. बरेचं लिहण्यासारखे आहे खुप लिखाण होईल म्हणुन थांबतो ....
प्रदिप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

Comments
Post a Comment