बेरोजगारी आणि त्यावरील उपाय
बेरोजगारी आणि त्यावरील उपाय.
- प्रदीप मनोहर पाटील
देशाला स्वतंत्र मिळाले आणि लोकशाही स्थपित झाली काळ होता गुलामी चा तो संम्पला. देशात शेती,व्यतिरिक्त काहीच न्हवत उदोग खुप मागे होता. पण नवं निर्मिती करण्यास सुरवात झाली आणि रस्ते महामार्गात रूपांतरित झाली. लघु उधोग मोठया कारखान्यात रूपांतरित झाली, शेती साठी आणि जनतेला पिण्या साठी पाणी वेवस्थापना साठी मोठं मोठी धरण बांधण्यात आली, पोलीस, शिपाई, सैनिक भरती होऊ लागली. कारकुन गुरुजी, अधिकारी नेमणुका होऊ लागल्या.डॉक्टर वकील निर्माण झाले. तहसील, कलेक्टर, ते मंत्रालय विकसित झाली. सुई पासुन ते वाहने विमान कृत्रिम ग्रह अवकाशात सोडले जाऊ लागले , वीजनिर्मिती, संशोधन प्रकल्प, अणुनिर्मिती , रेल्वे रस्ते विकसित झालेत. सुरक्षा वेवस्थित होऊ लागली . संरक्षण क्षेत्र अद्यावत झाले. , अंनत प्रकल्प उभी राहिली शासकीय ते सहकारी आणि व्यक्तिगत उधोग. उभे राहिले देशाने झपाट्यात प्रगती केली 1947 पासुन विकास सुरवात झाली ते 1980, पर्यन्त थोडं फार मागे पुढे काळ सारी जनता त्यात सामावली गेली सर्वी कडे भरभराट उदयास आली. उधोगात विकास प्रगती झाली सर्व कडे प्रगती दिसु लागली शहरं वाढली गाव खाली होऊ लागली विकास गंगा अवतरत होती टीव्ही नंन्तर मोबाईल कॉम्पुटर आली. आधुनिक तंत्रन्यान आलं. शेतकऱ्यांची आणि मजुरांची दैना अपवाद वगळता. सारं बदलाचे वारे वाहू लागले. तेव्हा पर्यन्त ची तरुण पिढी आणि बहुतेक जनता त्यात समाविष्ट झाली होती आणि आहे. तिथं पर्यन्त व्यवस्तीत होतं असं वाटते.
1980 पर्यंत काळ का सांगितला कारण या काळात मी पण बेरोजगार झालो सुमारे 2000 पर्यन्त नोकरी साठी धडपडत होतो प्रकल्पग्रस्त असुन सुद्धा नोकरी मिळाली नाही आमची शेती अनेर मध्यम प्रकल्पात 12एकर गेली होती 70 च्या दशकात 254 नोंदणी क्र. होता आहे जळगाव कार्यालयात पण माझ्या नंन्तर च्या मुलांना नोकऱ्या दिल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तीन शासकीय विभागात सर्व पुरतता झाली होती एनओसी पण झाली तरी मला डावललं आज पर्यन्त सुस्त भ्रष्ट यंत्रणा. कोणी बोलत नाही तर दखल घ्यायची नाही.हा माझ्या आणि माझ्या कुटूंबावर अन्याय केला त्या यंत्रणेनं. किती दुर्दैव लोकशाहीच त्यात माझ्या आयुष्यातील सुमारे 10 वर्ष वाया गेली बेरोजगार झालो पण त्यातुन सावरत प्रतिकुल परिस्थितीतुन भांडवल नसतांना भाऊ आणि मी मिळुन हॉटेल वेवसाय सुरु केला आणि उभा केला. असो सावरलो त्यातुन विषय उदा म्हणुन वेक्तीगत गाऱ्हाणं मांडले विषय आला म्हणुन. मुळ विषय त्याच काळात
नंन्तर त्याच बरोबर लोकसंख्या वाढ पण समोर आली त्या काळा नंन्तर खरी समस्या तरुणाई ला उध्दभवू लागली रोजगार आहे तेवढा समाविष्ट झाला होता नंन्तर कमी कमी रोजगार संधी मिळु लागल्या अति प्रगत कारखानदारी यायला लागली 10 मजूर काम करत तेथे 1मजूर काम करू लागले आणि समस्या रोजगाराच्या कमी झाल्या. शासकीय निमशाशकीय नोकऱ्या कमी होऊ लागल्या रिक्त पद कमी आणि तरूण वर्ग जास्त. बाकी बेरोजगार होऊ लागली नव्हे बरीच झालीत आणि होत आहेत. अराजकता बेकारी वाढली .आपण आतापर्यंत बेरोजगारी कशी उदयास आली ते पाहिले मुळ विषय या पुढे त्या वरील उपाय.... उपाय काय करावेत तसं पाहिलं तर कोणाचंच डोकं चालणार नाही असं वाटते. आणि सरकार सामाजिक संस्था आणि मुळ जनता या गंभीर विषयी कोणीच फार गांभीर्याने बोलतांना दिसतं नाही राजकारणी निवडणुकीत फक्त वलग्ना करून मोकळे होतात सत्ता आल्या नंतर त्या वर गांभीर्याने पावलं उचलली जात नाहीत असं वाटतं. या वर मला वाटतं सुशिक्षित बेरोजगार तरूण हे स्वतः त्यांनी काहीतरी मार्ग काढुन या दुनियेत टिकायचं असेल तर नाही मिळाली नोकरी तर वाईट वाटतं थोडं पण त्यातुन लवकर सावरून परिस्थिती नुसार लढायला शिकलं पाहिजे शून्य भांडवल असतांना सुद्धा आपण उधोग कसा उभा करू ते पाहिलं पाहिजे. आज भारतात अनेक असे उधोग आहेत जे करतांना काहिच भागभांडवल लागतं नाही. विश्वास आणि आपली राहणीमान बोलणं वागणं या जोरावर बचत वृत्ती करून दाखवु मला बनायचंच मोठं तुम्हाला कोणी प्रगती पासुन रोखु शकणार नाहि त्या साठी फक्त आपली शोधक नजर शिकुन घ्यायची वृत्ती हवी आपण तर कामाला लागु आपल्या मार्फत सुरवातीला चार लोकांना रोजगार निर्माण होईल असं... उदा. सांगतो कसं बिनपैश्यात रोजगार प्रगत युग आलं त्याचा फायदा शोधक नजर ठेवली कि होतो घरी बसुन मोबाईल वर लोक जोडुन एख्याद्या. कंपनी बरोबर जुळुन ऑनलाईन शॉपिग करतो तसं मार्केटिंग पण होऊ शकत इकडे ऑर्डर घ्यायची तिकडे ऑर्डर टाकुन माल पाठवायचा मध्ये कमिशन काढुन. बरेचं काही करता येऊ शकतं तद नंन्तर घर बांधणी उधोग ऍडव्हान्स घ्यायचा घर बांधुन दयायच शासकीय कामात सुद्धा पहिली उचल उचलुन काम करायच आणि जे काम झालं त्यावर अजुन उचल घेऊन पुर्ण करायच. उधोग करतांना कामाची लाज बाळगु नये पहिला मुदा लोक काय म्हणतील असला उधोग करतांना लोक काही उपाशी असलो तर विचारणार नाहीत काही हवं का? उलट अवहेलना करतील तरूण आहे काही करत नाही. म्हणुन काहीतरी केले पाहिजे हातपाय हलवले पाहिजे भले सुरवातीला अपयश येईल पण मार्ग नक्की मिळेल. जरी उधोग लहान असो वा ठराविक समाज जातीधर्म करत असलेला असो. हे काम आपलं नाही असं म्हणु नये जे सुचलं जमेल ते करावे वाईट सोडून पण. मी पाहतोय बाजार समितीत व्यापारी मोठया व्यापारी कडुन ऑर्डर घेतो ऍडव्हान्स घेतो शेतकऱ्या कडुन कमी किमतीत माल खरेदी करून पैसा कमवतो. ग्रामीण भागात तर व्यापारी माल खरेदी करतात विकुन शेतकऱ्यास पैसे आणुन देतात विश्वास महत्वाचा. बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगार तरुण वर्ग स्वतः सक्षम होऊन रडायचं नाही तर लढाईच परिस्थिती बरोबर आणि पुढे जायच बऱ्याच समस्या सुटतील नोकरी मिळाली तर घ्यायची नाही तर कामाला लागायचं इतकंच...उधोग क्षेत्रात शेकडो उदाहरणं अशी आहेत जी शुन्यातून निर्माण झालीत.. समस्या कोणी सोडवणार नाही तरुणांनी स्वतः सोडवायची असंच मी म्हणेल..तोच खरा उपाय . माझ्या विचारा बरोबर सहमत असावं असं नाही माझ्या अल्प बुद्धीला सुचलं ते लिहिले..
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर. ता. चोपडा
जिल्हा. जळगाव. ©®


Comments
Post a Comment