संस्कृती
संस्कृती
संस्कृती म्हणजे काय तर आपण सारे मिळून सभोवतालचा समाज लोक जीवन जगत असतांना करत असलेली चांगली सुंदर कृती जी कृती आपल्याला आणि इतरांना छान वाटते मनाला भावते जीवन जगण्याची साधी सरळ आध्यात्मिक सत्य मार्ग पद्धत ती संस्कृती. त्यात वाईट असेल तर ती वाईट संस्कृती. मग त्यात आपलं राहणं घर घराची अंतर बाह्य सजावट कशी अंगण कसं पुर्वी अंगणात सडा रांगोळी दरवाज्यावर तोरण, समोर तुळस असं राहायचं. लोकांन बरोबर वागण, चालणं, बोलण कसं या वर आपली आणि आपल्या घरच्यांची संस्कृती इतरांना समजते. आपण आणी सभोवतालचा परिसर त्यात गावाचा रस्ता कसा गावातील लोकांचे सण उत्सव कश्या पद्धतीने साजरे करतात त्या वरून गावाचा लौकिक आणी गावाची संस्कृती कळत असते. तसंच देशाचं अन राज्याचे. त्या वरून आपली संस्कृती कशी हे ठरते. तसं पाहिलं तर आपल्या देशात विविध जातीधर्माचे विविध संस्कृती जोपासणारे लोक आहेत. प्रत्येकाची संस्कृती वेगळी. जीवन जगण्याची पद्धत वेगळी. पूर्वी सारी लोक प्रत्येक जण आपली संस्कृती जोपासुन दुसऱ्यांच्या संस्कृती बद्धल आदर ठेवत. पण आता असं वाटतं प्रत्येकाला आपणच महान आपलीच संस्कृती महान असा गोड गैरसमज झालाय असं वाटत.पण तसं नाही प्रेत्येकाची जीवन जगायची शैली वेगळी असली तरी त्यांच्या साठी ती त्यांना वाटणारी छान संस्कृती आहे.. मी हिंदु धर्मात जन्मलो, वाढलो, आणी मरणार हिंदु म्हणुन त्या बद्धल बोलतो इतरांना चांगलं वाईट बोलायचा माझा अधिकार नाही. म्हणुन माझ्या संस्कृती वर लिहतोय आणी त्याची अल्प बुद्धीने मला ग्यात असलेली ती चुक पण असु शकते तरी माहिती सांगतो.
नदी जशी अति पाऊस आला तर आपला प्रवाह मार्ग बदलते तसं अनादी काळ ते आज पर्यंत अनेक स्थितंतरे आलीत काळ वेळ नुसार शैली बदलत गेली तरी संस्कृती अबाधित राहिली. सुरवात उदा रामायणात राम रामराज्य त्यांची वागण्या बोलण्या राहण्याची पद्धत एक पत्नी सत्य धर्मनिष्ठा. तेच नंन्तर महाभारतात पाच भाऊ एक पत्नी कृष्ण त्यांची युद्ध नीती आपण सत्य म्हणुन युद्ध करतांना जिंकण्या साठी भावनिक खोटं बोलणं. त्यात आपण खरं आहोत म्हणुन चांगलं करण्यासाठी थोडं खोटं जरी बोललो केले तरी चालेल असा कृष्णा ने केलेला गैरसमज. आपण सत्या साठी काम करतोय तर त्या साठी खोटं बोललो तरी चालेल पण स्वतः देव पुरुष असुन सुद्धा त्याची फळे त्यांना नंन्तर मिळाली. प्रभु रामचंद्र यांना पुर्वी केलेलं कर्म म्हणुन वनवास भोगावा लागला याचा अर्थ देवा ला पण त्याचे परिणाम भोगावे लागले तर आपण कुठं. काहीही असो सत्या साठी का असे ना चुकीचं खोटं कधी करू नये असंच. काळ बदलत गेला आणी जातोय कलियुग.म्हणतो ते आलंय कुठं बुरखा उतरला तर कुठं वाढला मग तो बचावा साठी का असे ना तोंडाला बांधण असं राहणीमान कपडे कधी कोण कसं घालेल सारं भिन्न विभिन्न तरी पण एकत्र. एकाच कुटूंबातील लहानथोर यांच राहणे वागणं बोलणं पद्धत वेगवेगळी भासु लागली विचार भिन्न आचार भिन्न तरी समजूतदारपणा आला. कुठं सुनेला मुलगी मानु लागले ती पण आईवडील समजु लागली कुठं त्या हुन भिन्न एकमेकांना बाहेर काढु लागले पैश्या मागे धावु लागले. या युगात आधुनिकता लोक प्रगत झाली खुप चांगलं पण आलं म्हणूनच कदाचित दुसरी बाजु वाईट तेवढीच वाढली.. संस्कृती एकमेकात विलीन झाली काही अशीं अनुकरण चांगलं घेऊ लागले त्या सोबत थोडं वाईट पण उचलले जाऊ लागले.. काळ महिमा म्हणु जी आमचं म्हणु असं राहिलं नाही तर एकरूप झाल्या सारखं वाटते. बदल हा निसर्ग नियम...
हे माझं वयक्तिक मतं आपण सहमत असावं असं नाही मला कोणाच्या भावना पण दुखवायच्या नाहीत... जे आहे ते लिहिले असं मला वाटत....
प्रदिप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

Comments
Post a Comment