पर्यावरण
|| पर्यावरण ||
होतं घनदाट जंगल
चोहीकडे सारं हिरवं
पशुपक्षीची गजबज सर्व
होतं छान पर्व…
वृक्षांनंपासुन हवा शुद्धीकरण
होई माणसाचं भरण
आलं विकासचं तोरण
उगवलं नवं औदोगीकरण…
प्रगती झाली छान
भौतिक सुखाला मान
उडू लागलं विमान
गेलं निसर्ग संतुलन…
उडाला प्रदूषण धुराडा
वृक्ष प्राणी पशुपक्षी
माणुस त्यांचा भक्षी
जाऊ लागला अंतरीक्षी…
प्लास्टिक कचरा वाढला
जीव गेला गाडला
व्हायरस आता पसरला
कर्म भोग अवतरला…
छेडछाड नको सृष्टी
ठेवु दुर दुरदृष्टी
व्हा सारी रक्षी
निसर्गानेच दिली दृष्टी…
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®


Mastch
ReplyDeleteछान च
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete