नारी शक्ती ✍️

 ||नारी शक्ती|| 


शक्ती रूप नारी 
दृष्टांवर पडते भारी 
शिकवली तिनेच दुनियादारी 
 करुणा मूर्ती तरी...
 
दिशा संदेश देत 
कर्तव्य कर्तृव भुवरी 
कुटुंब तीच तारी 
वेदना सोसून जरी....
 
यातना तिलाच तरी 
अग्नपरीक्षेत तीच खरी 
सर्वास पुरून उरी 
नराचा नारायण करी...
 
एकनिष्ठ परीक्षा जरी 
देते हसत बावरी 
वसा मानव पालनाचा 
तिच्याच पडला उदरी...
 
घुंगट पदर घेत 
लावण्य रूप अनेक 
रंग मोहक दाहक 
सृष्टी सारी तारक...
 
माजली दृष्ट राक्षस 
खोचुन पदर तीच 
 मुंडकं तोडते हिच 
देव मानव रक्षिती तीच...
 

-प्रदीप पाटील 
गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव  ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे